---Advertisement---

धक्कादायक! महत्त्वाच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या प्रमुख ३ खेळाडूंना कोरोनाची लागण

On: रविवार, डिसेंबर 12, 2021 2:51 PM
West-Indies
---Advertisement---

नुकताच पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावरून परतला आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान संघाने टी२० आणि कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. येत्या काही दिवसात वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तान गाठल्यानंतर वेस्ट इंडिजचे ३ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. संघ व्यवस्थपनातील एका गैर-प्रशिक्षण सदस्यासह वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडूंची कोव्हिड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यामध्ये रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल आणि काईल मेयर्स यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये पोहचल्यानंतर खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. ज्यापैकी या ३ खेळाडूंची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल, अष्टपैलू खेळाडू रोस्टन चेज आणि काईल मेयर्ससह संघ व्यवस्थपनातील एका गैरप्रशिक्षण सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे खेळाडू या संपूर्ण मालिकेत खेळताना दिसून येणार नाहीये. सर्व खेळाडूंना देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

या खेळाडूंना संघातील इतर खेळाडूंपासून दूर ठेवण्यात आलं आहे. तसेच हे खेळाडू १४ दिवस विलागिकरणात राहणार आहेत. तसेच जोपर्यंत या खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत या खेळाडूंना विलगिकरणात राहावे लागणार आहे. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला सोमवार पासून (१३ डिसेंबर) प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कराचीमध्ये पार पडणार आहेत.

असे असेल पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक

टी२० मालिका
पहिला टी२० सामना – १३ डिसेंबर, कराची
दुसरा टी२० सामना – १४ डिसेंबर, कराची
तिसरा टी२० सामना – १६ डिसेंबर, कराची

वनडे मालिका 
पहिला वनडे सामना – १८ डिसेंबर, कराची
दुसरा वनडे सामना – २० डिसेंबर, कराची
तिसरा वनडे सामना – २२ डिसेंबर, कराची

महत्वाच्या बातम्या : 

अर्रर्र! क्रिकेट इतिहासातील अशा ४ बॅट, ज्यामुळे झाले खूपच मोठे वाद

हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!

‘ऍशेसबद्दल काही ट्वीट का नाही केले?’ चाहत्याच्या प्रश्नावर जाफरचं मन जिंकणारं उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---