भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रेम प्रकरणामुळे अनेकदा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनुष्का शर्माची एन्ट्री झाली. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी अखेर विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ मध्ये हे दोघेही विवाह बंधनात अडकले होते. ही जोडी बॉलिवुड आणि क्रिकेट विश्वात प्रसिध्द जोडी पैकी एक आहे. आता विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबतच्या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
विराट कोहलीने अमेरिकन टेलीविजन स्पोर्ट्स रिपोर्टरसोबत संवाद साधताना आपल्या पहिल्या भेटीबद्दलचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. त्याने म्हटले की, “माझी आणि तिची (अनुष्का शर्माची) भेट शाम्पूच्या एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये होणार होती. मॅनेजरने जेव्हा मला सांगितले की, माझ्यासोबत अनुष्का शर्मा काम करणार आहे. त्यावेळी माझा आत्मविश्वास खालावला होता. आत्मविश्वास खालावण्याचे कारण असे होते की, एक अभिनेत्री म्हणून तिने स्वतःला सिद्ध केले होते. त्यावेळी माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मी एक जोकची मदत घेतली होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “अनुष्का खूप ऊंच आहे. माझी उंची साधारण आहे. त्यावेळी मला सांगण्यात आले होते की, अनुष्का शर्मा हील (सँडल) घालणार नाहीये. परंतु, जेव्हा ती आली, त्यावेळी माझी उंची तिच्यापेक्षा जास्तच होती. त्यावेळी मी तिला म्हटले की, ‘यापेक्षा मोठी हील घालता येत नाही का?’ या जोकमुळे आमच्यातील तणाव संपला. अनुष्का प्रोफेशनल असल्यामुळे तिने यावर काहीच प्रतिक्रीया दिली नाही. संपूर्ण जाहिरातीची शूटिंग सुरू असताना तिचा आत्मविश्वास उंचावलेला होता.”
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यांच्या विवाह सोहळ्याला नुकताच ४ वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच विवाह झाल्याच्या ३ वर्षानंतर या दोघांच्या आयुष्यात वामिकाचे आगमन झाले होते. येत्या ११ जानेवारी रोजी वामिका १ वर्षांची होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची ‘टीम इंडिया’ला संधी, ‘या’ तारखेला होणार सामना
अबब! ३९९ ते ४०० कसोटी विकेट्सपर्यंतचा प्रवास करण्यासाठी नेथन लायनला लागले तब्बल ३२६ दिवस
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!