लीड्स। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात हेडिंग्ले, लीड्स येथे शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी ठरलेल्या तिसऱ्या ऍशेस कसोटी सामन्यात इंग्लंडने 1 विकेटने विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
इंग्लडकडून या विजयात बेन स्टोक्सने दुसऱ्या डावात नाबाद 135 धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद 76 धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय साकारुन दिला.
लीच आणि स्टोक्सची भागीदारी सुरु असताना अखेरच्या काही षटकात हा सामना दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी होती. या सामन्यात ज्यावेळी इंग्लंडला विजयासाठी केवळ 2 धावांची गरज असताना आणि त्यांच्याकडे केवळ एकच विकेट शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायनने लीचला धावबाद करण्याची संधी गमावली.
ही घटना इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 125 व्या षटकात घडली. या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टोक्स एकेरी धाव घेण्यासाठी धावला नाही. पंरतू लीच खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत धावत आला होता. यावेळी लायनच्या हातातून चेंडू निसटल्याने लीचला धावबाद करण्याची संधी ऑस्ट्रलियाला गमवावी लागली.
ही घटना घडताना समालोचकांनाही त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. हे एका सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
Test Match Special या अकाऊंटवरुन ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसले की इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकसह समालोचन करणारे समालोचक लायनने धावबाद करण्याची संधी सोडल्यानंतर ओरडत चक्क उभे राहिले होते.
यावेळी कूकलाही त्याच्या भावना आवरता आल्या नसल्याचे दिसले आहे. तसेच या समालोचकांनी जे घडले ते उभे राहून वर्णन केले. तसेच त्यावेळी समालोचकांच्या मागे बसलेल्या प्रोड्यूसरही हे सर्वपासून आश्चर्यचकीत झाल्याचे दिसले.
We know how it finished, but what might have been…
😲#bbccricket pic.twitter.com/2F77zxccJh
— Test Match Special (@bbctms) August 26, 2019
तसेच त्यानंतर लायनने गोलंदाजी केलेल्या 125 व्या षटकाच्याच शेवटच्या चेंडूवर स्टोक्स पायचीत झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अपील केले. मात्र पंच जोएल विल्सन यांनी नाबाद दिले. तसेच ऑस्ट्रेलियाने त्यांचा रिव्ह्यू आधीच गमावला होता. त्यामुळे त्यांना पंचांच्या निर्णयावर समाधान मानावे लागले.
परंतू नंतर पाहिलेल्या एका रिव्ह्यूमध्ये स्टोक्स पायचीत बाद असल्याचे स्पष्ट दिसले. मात्र पंचांनी नाबाद दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना काही करता आले नाही. अखेर इंग्लंडने हा सामना 1 विकेटने जिंकला.
Oh go on then… Here's the LBW shout not given by umpire Wilson.#bbccricket pic.twitter.com/DeoUkPbJRW
— Test Match Special (@bbctms) August 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताचा हा दिग्गज कर्णधार म्हणतो, टीम इंडियाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावायला हवी
–या कारणामुळे रोहितला मिळाली नाही ११ जणांच्या टीम इंडियात संधी, विराटने केला खूलासा
–जसप्रीत बुमराह, बेन स्टोक्सची कसोटी क्रमवारी मोठी झेप