---Advertisement---

या कारणामुळे रोहितला मिळाली नाही ११ जणांच्या टीम इंडियात संधी, विराटने केला खूलासा

On: मंगळवार, ऑगस्ट 27, 2019 4:25 PM
---Advertisement---

रविवारी(25 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना अँटिग्वा येथे पार पडला. या सामन्यात भारताने 318 धावांनी मोठा विजय मिळवला. हा विजय कसोटी चॅम्पियनशिपमधीलही भारतीय संघाचा पहिला विजय ठरला आहे.

मात्र या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात रोहित शर्माला संधी न दिल्याने मोठी टीका झाली होती. रोहित ऐवजी हनुमा विहारीचा 11 जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

पण हा सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहितला 11 जणांंमध्ये स्थान न देता विहारीला संधी देण्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, विहारी गोलंदाजीही करु शकतो, त्यामुळे त्याला पसंती देण्यात आली.

विराट म्हणाला, ‘संघातील संयोजन महत्त्वाचे असल्याने विहारीला संधी मिळाली. तो एक चांगला पार्ट टाईम गोलंदाज आहे आणि आम्हाला त्याची मदत होते.’

‘आम्ही गटचर्चा (ग्रुप डिस्कशन) केली. त्यानंतर आम्ही संघासाठी काय योग्य आहे हा निर्णय घेतला आहे. संघाच्या अंतिम 11 जणांबद्दल नेहमीच काहीतरी विचार असतो. लोकांना हे समजले पाहिजे की हे संघाच्या हिताचे आहे.’

विहारीनेही त्याची निवड योग्य ठरवत विंडीज विरुद्ध दुसऱ्या डावात 93 धावांची खेळी केली. तसेच उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर शतकी भागीदारीही रचली. यामुळे भारताला विंडीजसमोर 419 धावांचे मोठे आव्हान उभे करण्यात मदत झाली.

भारताचा वेस्ट इंडीज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जमैकाला 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

जसप्रीत बुमराह, बेन स्टोक्सची कसोटी क्रमवारी मोठी झेप

यूएस ओपन: भारताच्या सुमित नागलने फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकत रचला इतिहास

वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment