fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

यूएस ओपन: भारताच्या सुमित नागलने फेडरर विरुद्ध पहिला सेट जिंकत रचला इतिहास

आज(27 ऑगस्ट) यूएस ओपन ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या 22 वर्षीय सुमित नागल आणि स्विझर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांच्यात सामना झाला. या सामन्यात फेडररने 4-6, 6-1, 6-2, 6-4, अशा फरकाने चार सेटमध्ये विजय मिळवला. या सामन्यात नागलला पराभूत व्हावे लागले असले तरी त्याने एक खास इतिहास रचला आहे.

जागतिक क्रमवारीत 190 व्या क्रमांकावर असणाऱ्या नागलने या सामन्यात आज पहिला सेट 4-6 असा जिंकत दमदार सुरुवात केली होती. विशेष म्हणजे फेडररविरुद्ध एक सेट जिंकणारा नागल पहिलाच भारतीय ठरला आहे.

याआधी रोहन बोपन्ना आणि सोमदेव देववर्मन या भारतीय टेनिसपटूंचा सामना फेडररशी झाला आहे. परंतू त्यांना फेडररविरुद्ध एकही सेट जिंकता आला नव्हता.

नागल आणि फेडररमधील पहिला सेट सुरुवातीला अटीतटीचा सुरु होता. पहिल्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी होती. पण त्यानंतर नागलने पुढील 2 गेम जिंकत हा सेट 6-4 असा जिंकला. या सेटनंतर मात्र फेडररने शानदार पुनरागमन करत पुढिल तीनही सेट 6-1, 6-2, 6-4 अशा फरकाने जिंकले आणि सामनाही जिंकला.

कोण आहे सुमित नागल – 

नागलचा जन्म 16 ऑगस्ट 1997 ला हरियाणा राज्यातील झज्जर जिल्हात झाला. त्याच्या कुटुंबामध्ये कोणाचीही पार्श्वभूमी टेनिसशी निगडीत नाही. परंतू त्याचे वडील सुरेश नागल यांनी त्याला टेनिस खेळाकडे वळवले.

नागल हा अन्य भारतीयांप्रमाणेच लहानपणी क्रिकेट खेळायचा. पण नंतर वयाच्या 8 व्या वर्षी त्याच्या वडीलांनी त्याला टेनिस कोर्टचा मार्ग दाखवला. त्यानंतर दोन वर्षींनी भारताचा दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीच्या अकादमीत ट्रेनिंगसाठी त्याची निवड झाली.

नागल सध्या जर्मनीमध्ये नेन्सेल अकादमीमध्ये ट्रेनिंग करत आहेत. साशा नेन्सेल हे त्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्याने 2015मध्ये ज्यूनियर विम्बल्डनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.

रॉजर फेडरर विरुद्ध पुरुष एकेरीत भारतीय टेनिसपटूंचे प्रदर्शन –

रोहन बोपन्ना – 6-7, 2-6 (हाले, 2006)

सोमदेव देववर्मन – 3-6,3-6 (दुबई, 2011)

सोमदेव देववर्मन – 2-6,1-6,1-6 (फ्रेंच ओपन, 2013)

सुमित नागल – 6-4, 1-6, 2-6, 4-6 (यूए ओपन, 2019)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

बेन स्टोक्समुळे जॅक लीचला कायमस्वरुपी मिळणार मोफत चश्मा, जाणून घ्या कारण

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने मोडला कपिल देव यांचा हा खास विक्रम

You might also like