Loading...

विंडीज विरुद्ध शतकी खेळी करत अजिंक्य रहाणेने मोडला कपिल देव यांचा हा खास विक्रम

अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने रविवारी(25 ऑगस्ट) 318 धावांनी विजय मिळवला.

भारताकडून या सामन्यात अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 81 धावांची अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात 102 धावांची शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच त्याने केलेल्या या शतकी खेळीमुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.

रहाणेने या सामन्यात दुसऱ्या डावात 242 चेंडूत 102 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार मारले. भारतीय संघाकडून कसोटीत 5 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत केलेले रहाणेचे हे 9 वे शतक आहे.

त्यामुळे तो 5 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने कपिल देव यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. कपिल देव यांनी भारताकडून 5 किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत 8 शतके केली आहेत.

तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर 20 शतकांसह भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आहेत. त्यांच्यापाठोपाठ 11 शतकांसह व्हीव्हीएस लक्ष्मण आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर प्रत्येकी 10 शतकांसह सौरव गांगुली आणि पॉली उम्रीगर आहेत.

Loading...

अँटिग्वा कसोटीत रहाणेने केलेल्या शतकी खेळीच्या मदतीने भारताने दुसऱ्या डाव 7 बाद 343 धावा केल्यानंतर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या 75 धावांच्या आघाडीसह भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 419 धावांचे आव्हान ठेवले होते.पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात सर्वबाद 100 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या.

कसोटीमध्ये 5 व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

20 – मोहम्मद अझरुद्दीन

Loading...

11 – व्हीव्हीएस लक्ष्मण

10 – सौरव गांगुली/ पॉली उम्रीगर

9 – अजिंक्य रहाणे

8 – कपिल देव

Loading...

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

जे कोणत्याही आशियाई गोलंदाजाला जमले नाही ते जसप्रीत बुमराहने करुन दाखवले!

शिवशक्ती क्रीडामंडळने पटकावले पुणेरी पलटण आंतर क्लब कबड्डी, नाशिक स्पर्धेचे विजेतेपद

अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह भारताचा पहिलाच गोलंदाज

Loading...
You might also like
Loading...