अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात 100 धावांवर सर्वबाद करत 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात 8 षटके गोलंदाजी करताना 7 धावांत 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच तो कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना एका डावात 10 पेक्षा कमी धावा देत 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा जगातील एकूण 11 तर भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी असा पराक्रम ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्क, बर्ट आयर्नमॉन्गर, टिम मे आणि एर्नी तोशॅक यांनी, इंग्लंडच्या आर्थर गिलिगन आणि जॉर्ज लोहमनने, दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोव फिलँडर आणि डेल स्टेनने तसेच वेस्ट इंडीजच्या जेर्मिन लॉसन आणि केमार रोच या गोलंदाजांनी केला आहे.
बुमराहला अँटिग्वा कसोटीत पहिल्या डावात केवळ 1 विकेट घेण्यात यश आले होते. पण त्याने दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करताना 5 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजला 100 धावांवर रोखण्यात भारताला मदत झाली.
या सामन्यात भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित करत पहिल्या डावात मिळवलेल्या 75 धावांच्या आघाडीसह वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 419 धावांचे आव्हान ठेवले होते.पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात सर्वबाद 100 धावाच करता आल्या.
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या.
https://twitter.com/ICC/status/1165822529132478464
क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा मोठा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच भारतीय कर्णधार
–कर्णधार कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडलाच पण मिस्बाह-उल-हकचाही विक्रम आहे धोक्यात






