---Advertisement---

जे कोणत्याही आशियाई गोलंदाजाला जमले नाही ते जसप्रीत बुमराहने करुन दाखवले!

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2019 4:45 PM
---Advertisement---

अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात 8 षटके गोलंदाजी करताना 7 धावांत 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

याबरोबरच बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या चार देशात एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही आशियाई गोलंदाजाला या चारही देशात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट एका कसोटी डावात घेता आल्या नव्हत्या.

या सामन्यात बुमराहला पहिल्या डावात केवळ 1 विकेट घेण्यात यश आले होते. पण त्याने दुसऱ्या डावात शानदार कामगिरी करताना 5 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजला 100 धावांवर रोखण्यात भारताला मदत झाली.

या सामन्यात भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित करत पहिल्या डावात मिळवलेल्या 75 धावांच्या आघाडीसह वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 419 धावांचे आव्हान ठेवले होते.पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला दुसऱ्या डावात सर्वबाद 100 धावाच करता आल्या.

तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या.

क्रिडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

शिवशक्ती क्रीडामंडळने पटकावले पुणेरी पलटण आंतर क्लब कबड्डी, नाशिक स्पर्धेचे विजेतेपद

अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह भारताचा पहिलाच गोलंदाज

असा मोठा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच भारतीय कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment