पर्थ। येथे सुरु असलेला तिसरा ऍशेस सामना हा इंग्लंडचा फलंदाज ऍलिस्टर कूकचा हा कारकिर्दीतील १५० वा कसोटी सामना आहे. हा सामना खेळताना त्याने पदार्पणानंतर सर्वात कमी दिवसात १५० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.
हा विक्रम करताना त्याने भारताच्या राहुल द्रविडला मागे टाकले आहे. कूकने १५० कसोटी खेळण्यासाठी ११ वर्षे आणि २८८ दिवस घेतले. या आधी हा विक्रम द्रविडच्या नावावर होता. द्रविडने १५० कसोटी खेळण्यासाठी १४ वर्षे आणि २०० दिवस घेतले.
याबरोबरच कूक १५० कसोटी सामने खेळणारा जगातील आठवा आणि इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत ४५.६९ च्या सरासरीने ११६९८ धावा केल्या आहेत. यात त्याचे ३१ शतके आणि ५५ अर्धशतके सामील आहेत.
सर्वात कमी दिवसात १५० कसोटी खेळणारे खेळाडू:
– ऍलिस्टर कूक – ११ वर्षे २८८ दिवस
-राहुल द्रविड – १४ वर्षे २०० दिवस
-अॅलन बॉर्डर-१४ वर्षे २४३ दिवस
-रिकी पॉन्टिंग – १४ वर्षे ३६५ दिवस
– जॅक कॅलिस- १६ वर्षे २३ दिवस
१५० कसोटी सामने खेळणारे खेळाडू
-सचिन तेंडुलकर (२००)
-रिकी पाँटिंग (१६८)
-स्टीव वॉ (१६८)
-जॅक कॅलिस (१६६)
-शिवनारायण चंद्रपॉल (१६४)
-राहुल द्रविड (१६४)
-अॅलन बॉर्डर (१५६)
-ऍलिस्टर कूक (१५०*)