इंग्लंडचा महान फलंदाज ऍलिस्टर कूकचा आज (25 डिसेंबर) 38 वा वाढदिवस आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वर्षे इंग्लंडकडून खेळताना अनेक विक्रम केले आहेत. धावांचा डोंगर उभारताना त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते, मात्र भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला खेळणे मात्र त्याच्यासाठी कठिण गेले.
इशांतने कूकला 11 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले आहे. कूकला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्यात इशांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात पहिल्या क्रमांकावर मोर्ने मॉर्केल असून त्याने कूकला 12 वेळा बाद केले आहे.
विशेष म्हणजे कूकने इशांतला जूलै 2014 मध्ये ट्रेंट ब्रिजवर झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी बाद केले होते. ही कूकची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली आणि एकमेव विकेट आहे. हा सामना अनिर्णित राहिला होता.
त्यामुळे इशांतची विकेट घेण्याचा पश्चाताप होत असल्याचे कूकने गंमतीने एकदा म्हटले होते.
सप्टेंबर 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर कूक जेव्हा पहिल्यांदाच पत्रकारांच्या समोर आला त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात त्याने इशांत शर्माला बाद करण्याचा पश्चाताप होत असल्याचेही गंमतीने म्हटले होते.
तो म्हणाला, “मला पश्चाताप वाटत आहे की मी इशांत शर्माला बाद करत माझी पहिली विकेट घेतली. कारण मागील काही मालिकांपासून तो याचा सतत बदला घेत आहे.”
Alastair Cook famously took one Test wicket – one he regrets a little!#ENGvIND #CookRetires pic.twitter.com/oRdfV1NABT
— ICC (@ICC) September 5, 2018
कूकने 161 कसोटी सामने खेळले असून यात 45.35 च्या सरासरीने 12,472 धावा केल्या आहेत. यामध्ये 33 शतके आणि 57 अर्धशतकांसह 12,254 धावा केल्या आहेत.
तसेच वनडेमध्ये त्याने 92 सामन्यात 3204 धावा केल्या आहेत. याबरोबरच तो 4 टी20 सामने खेळला असून त्यात त्याने 61 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सर्वकाही
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम