इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक याच्या क्रिकेट कारकिर्दीची शुक्रवारी (13 ऑक्टोबर) अखेर झाली. 29 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या काऊंटी हंगामात त्याने आपला अखेरचा सामना खेळला. त्यानंतर आता आपल्या वीस वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीची अखेर करत असल्याचे त्याने सांगितले.
Alastair Cook retired from all forms of cricket.
– Thank you, legend. pic.twitter.com/pJ0izD4awy
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2023
ऍलिस्टर कूक (Alastair Cook) इंग्लंड क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. 2018 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला शेवटचा सामना भारताविरुद्ध कसोटी प्रकारात खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना कूकचे वय अवघे 33 वर्ष होते. त्यानंतर कूक देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. कूक काऊंटी संघ एसेक्सचा महत्वाचा खेळाडू राहिला असून, संघ हंगामातील आपला शेवटचा सामना नॉर्थऍम्पटनशायर संघाविरुद्ध 26 ते 29 सप्टेंबर यादरम्यान खेळला. तो दोन्ही डावात प्रत्येकी 6 धावा करू शकला. दुर्दैवाने या सामन्यात त्याच्या संघाला डावाने पराभूत व्हावे लागले.
त्याने आपल्या वीस वर्षाच्या प्रथमश्रेणी कारकीर्दीत 352 सामने खेळले. यामध्ये त्याने 46.41 च्या सरासरीने 26,643 धावा केल्या. यामध्ये त्यांनी 125 अर्धशतके तर 74 शतके काढली आहेत.
(Alastair Cook has retired from professional cricket)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद
IND vs PAK सामन्यापूर्वी होणार भव्य सोहळा, प्रसिद्ध बॉलीवूड गायक दाखवणार आपल्या आवाजाची जादू