इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने नुकताच ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथबद्दल त्याच्या आत्मचरित्रात मोठा खूलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की वॉर्नरने स्वत: कूकला त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चेंडूशी छेडछाड केली असल्याचे सांगितले होते.
सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून खेळत असलेल्या वॉर्नर, स्मिथ आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हे तीन क्रिकेटपटू मागीलवर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या केपटाऊन कसोटीतील चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळले होते.
त्यानंतर वॉर्नर आणि स्मिथवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली होती. हा बंदीचा कालावधी पूर्ण करत या तिघांनीही यावर्षीच्या ऍशेस मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
पण आता पून्हा एकदा कूकने वॉर्नर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही हाताला पट्टी बांधून चेंडूशी छेडछाड करत असल्याचा खूलासा केला आहे.
गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार 2017-18 च्या ऍशेस मालिकेच्या आठवणींबद्दल कूकने लिहिले आहे की ‘डेव्हिड वॉर्नरने सेलिब्रशन करताना बिअर पिल्यानंतर सांगितले होते की प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान त्याने हाताला बांधलेल्या पट्टीत एक वस्तू(सबस्टन्स)ठेवून चेंडूशी छेडछाड केली होती. त्यावेळी मी स्मिथकडे पाहिले, तेव्हा तो वॉर्नरकडे पाहून त्याला इशाऱ्यानेच म्हणाला, ‘तू हे सांगायला नको होते.”
मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला कूक गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत केपटाऊन कसोटीतील चेंडू छेडछाड प्रकरणाबद्दल भाष्य करताना म्हणाला, ‘स्टुअर्ट ब्रॉडने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या ऍशेसमध्ये त्यांना रिवर्स स्विंगही मिळत असल्याचे त्याने सांगितले होते. तूम्ही जे करत आहात त्यात बदल का? अचानक सँडपेपर कशासाठी?’
‘लोकांना माहित होते, काय सुरु आहे. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट घडली, कारण त्यांना कळाले की अशी गोष्ट अमान्य आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकणे ही जी संस्कृती ऑस्ट्रेलियाने तयार केली होती ती ऑस्ट्रेलियन लोकांना नको होती.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–आता पुन्हा ऐका क्रिकेटचे समालोचन ऑल इंडिया रेडिओवर…