इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने सोमवारी (२६ सप्टेंबर) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मोईन अली सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे आणि संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. मोईनने इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूट आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांना त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मोईन अलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, निवृत्तीनंतर त्याने एक अतिशय धक्कादायक खुलासाही केला आहे, ज्यात त्याने म्हटले आहे की, तोही बेन स्टोक्ससारखा चांगला अष्टपैलू खेळाडू बनू शकला असता; पण कर्णधार ऍलिस्टर कूकच्या एका निर्णयाने त्याची कारकीर्द बदलली आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो थोडा मागे राहिला.
मोईन अली म्हणाला, ‘मला आठवते जेव्हा आम्ही २०१५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी खेळलो होतो आणि बेन स्टोक्सने ९२ आणि १०१ धावांची खेळी खेळली होती. त्यासोबतच त्याने ३८ धावांत ३ बळी देखील घेतले होते. मी त्यावेळी ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करत होतो आणि तो ८ व्या क्रमांकावर होता. मला वाटते की, मी बार्बाडोसमधील सहाव्या क्रमांकाच्या शेवटच्या कसोटीत ६० धावा केल्या होत्या. पण यानंतर ऍलिस्टर कुक म्हणाला, पाहा, मला माहित आहे की तू चांगले खेळत आहेस. पण आम्ही गोष्टी बदलणार आहोत, कारण आम्हाला वाटते की स्टोक्स यापेक्षा चांगले करू शकतो. हे माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. मी असे म्हणणार नाही की हा चुकीचा निर्णय होता.’
अली पुढे म्हणाला, ‘अर्थातच स्टोक्स एक अद्भुत खेळाडू ठरला. पण मला कधीकधी वाटतं, कदाचित मला तिथे आणखी थोडी संधी दिली असती. तर मी स्टोक्ससारखा खेळाडू होऊ शकलो असतो. मला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. जर मला अधिक संधी दिली असती तर कदाचित मी अधिक चांगले केले असते.’
या ३४ वर्षीय अष्टपैलूने २०१४ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण ६४ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने २८.२९ च्या सरासरीने २९१४ धावा केल्या आहेत. तर त्याने ३६.६६ आणि सरासरी १९५ विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भुवीचा पॅटर्नच वेगळा! एकच विकेट घेऊनही झहीर अन् संदीपनंतर ‘असा’ कारनामा करणारा ठरला तिसराच गोलंदाज
ना रोहित, ना कोहली, आयपीएल फ्रँचायझीसाठी संजूचीच बॅट सर्वाधिक तळपते; ‘हा’ विक्रम देतो साक्ष
फक्त संजूचाच बोलबाला! कोहली, रैना अन् डिविलियर्सला मागे टाकत सॅमसनचा हैदराबादविरुद्ध ‘भीमपराक्रम’






