---Advertisement---

ना रोहित, ना कोहली, आयपीएल फ्रँचायझीसाठी संजूचीच बॅट सर्वाधिक तळपते; ‘हा’ विक्रम देतो साक्ष

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 11:49 PM
Sanju-Samson
---Advertisement---

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सोमवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने १६४ धावा केल्या होत्या. या डावात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने ८२ धावांची तुफानी खेळी केली होती. यासह त्याने मोठा पराक्रम करत मयंक अगरवालची बरोबरी केली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुसऱ्याच षटकात एविन लुईस ६ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने फलंदाजीला येत यशस्वी जयस्वाल सोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. या डावात संजू सॅमसनने चौफेर फटकेबाजी करत ५७ चेंडूंमध्ये ८२ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकर आणि ३ षटकार मारले.

या सामन्यात तो राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयंक अगरवालची बरोबरी केली आहे. मयंक अगरवाल आणि संजू सॅमसनने हा कारनामा प्रत्येकी ५-५ वेळेस केला आहे. तर संजू सॅमसननंतर शिखर धवन आणि क्विंटन डी कॉक यांनी हा कारनामा प्रत्येकी ४-४ वेळेस केला होता.

एकंदरीत जे रोहित शर्मा, एमएस धोनी, केएल राहुल आणि विराट कोहली अशा अनुभवी कर्णधारांनाही जमले नाही. ते संजूने आपल्या संधासाठी केले आहे.

संजू सॅमसनच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद 
संजू सॅमसनने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ७० धावांची खेळी केली होती. तर सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८२ धावा करत आयपीएल स्पर्धेत ३ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो १४ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी विराट कोहली आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि तिसऱ्या स्थानी सुरेश रैना आणि एमएस धोनी सारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हैदराबाद सोडून चेन्नई संघात जा…’, डेविड वॉर्नरला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रिया

हैदराबादविरुद्ध संजूची ८२ धावांची ‘कर्णधार खेळी’; ३ हजारी मनसबदार बनत धोनी, कोहलीच्या क्लबमध्ये सामील

‘मी कर्णधार असतो तर केव्हाच नेतृत्त्वपद सोडले असते’, केकेआरच्या ‘त्या’ कृतीवर भयंकर संतापला गंभीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---