इंग्लंडचा दिग्गज माजी क्रिकेटपटू अॅलिस्टर कुकला सर ही पदवी बहाल करण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ओव्हल स्टेडियमवर झालेल्या भारता विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कुकने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
कुकने 161 कसोटी सामन्यात खेळताना 45.35च्या सरासरीने 12472 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 33 शतके केली आहेत. तसेच प्रथम श्रेणीमध्ये 289 सामने खेळताना 22604 धावा केल्या आहेत.
येत्या 25 डिसेंबरला 34वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कुकला त्याच्या क्रिकेटमधील 12 वर्षाच्या योगदानाबद्दल नाईटहूड (सर) हा पुरस्कार नवीन वर्षात देण्यात येणार आहे.
सर ही पदवी मिळवणारा कुक हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बोथम नंतर दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. त्यांना 2007ला ही पदवी देण्यात आली होती.
2006ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना कुकने शतक झळकावले होते. यानंतर सलग तीन सामने खेळल्यावर तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. परत आल्यावर त्याने सलग 158 सामने खेळले आहेत.
शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कुकने शतक केले होते. तर निवृत्तीनंतरही तो एसेक्स या कौंटी संघासोबत पुढील तीन हंगाम खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू
–पर्थ कसोटीतील विजय आॅस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९९वा विजय
–कसोटी मालिकेत टीम इंडियाला रडवणारा सॅम करन आयपीएलमध्ये मालामाल…