कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्घ ऑस्ट्रेलियाच्या तिसर्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेल्या ३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाचा डाव २८९ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून ५९ धावा काढत झुंज दिलेल्या ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाने सामना कुठे गमावला, याचं कारण सांगितलं आहे.
ऍलेक्स कॅरेची विकेट ठरली टर्निंग पॉईंट
भारताच्या ३०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजीची सुरुवात अडखळत झाली होती. गोलंदाजांना मदत करणार्या मनुका ओव्हलच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघाची एकवेळ ५ बाद १५८ अशी नाजूक अवस्था झाली होती. मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऍलेक्स कॅरेने ५२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. ही जोडी ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत घेऊन जाणार असे वाटत असतानाच कॅरे धावबाद झाला.
Carey is run out after a mix up! Agar joins Maxwell in the middle.
Live #AUSvIND: https://t.co/L7AjidJPm9 pic.twitter.com/QgtOvA14BN
— cricket.com.au (@cricketcomau) December 2, 2020
याच क्षणानंतर सामना फिरला असं सांगत कॅरेच्या रनआउटमध्ये १०० टक्के माझी चूक होती, अशी कबुली ग्लेन मॅक्सवेलने दिली आहे. “ऍलेक्स कॅरे बाद झाल्यानंतर मी सामना शांतपणे संपवायला हवा होता. मात्र, मला ते जमले नाही. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आम्हाला जखडून ठेवलं,” असंही मॅक्सवेल पुढे म्हणाला.
स्विच हिट खेळण्यात काहीच गैर नाही
गेल्या काही दिवसांत ‘स्विच हिट’ या फटक्यावरुन क्रिकेट जगतातील वातावरण चांगलेच तापले आहे. इयान चॅपेल, शेन वॉर्न यांसारख्या दिग्गजांनी या फटक्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर काही आजी-माजी खेळाडू आणि पंचांनी मात्र या फटक्याचे समर्थन केले आहे.
ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करतांना अनेकदा हा फटका खेळत असल्याचे दिसते. त्यामुळे याबाबत त्याचे मत विचारले असता मॅक्सवेल म्हणाला, “स्विच हिट हा फटका खेळण्यात काहीही गैर नाही. क्रिकेटच्या नियमांच्या चौकटीत राहूनच हा फटका खेळला जातो. क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस बदलत आहे. फलंदाज आपल्या तंत्रात नवनवीन प्रयोग करून आपल्या खेळात सुधारणा करत आहेत. त्यामुळे धावांचा आलेखही उंचावतो आहे.”
फलंदाजांसह गोलंदाज देखील नकल बॉल, वाईड यॉर्कर सारखे विविध प्रयोग करत असतातच, त्यामुळे त्यांनीही नावीन्यपूर्ण कल्पनांनी फलंदाजांना रोखण्याचा मार्ग शोधावा, अशी पुस्तीही मॅक्सवेलने शेवटी जोडली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव