इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच आयपीएलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. रविवारी खेळाडू संघात पुन्हा करारबद्ध केल्या जाणाऱ्या खेळाडूंची यादी जमा करण्याची शेवटची तारीख होती. यातच काही खेळाडूंनी यावर्षी आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेणारा एक खेळाडू हा इंग्लंड देशाचा आहे, ज्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड संघाला विश्वचषक मिळवून देण्यास मदत केली.
हा खेळाडू आहे ऍलेक्स हेल्स (Alex Hales). हेल्सने यावर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट कोलकाता नाईट रायडर्स संघाने सोशल मिडीयावर ट्वीट केली. हेल्स का खेळत नाही या प्रश्नावर प्रकाश टाकताना कोलकाता संघाने म्हटले आहे की, राष्ट्रीय संघाचा व्यस्त दौरा आणि वैयक्तीक कारणामुळे तो खेळू शकत नाही.
हेल्सच्या आधी देखील काही खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये सॅम बिलिंग्स (Sam Billings) आणि पॅट कमिंस (Pat Cummins) यांचादेखील समावेश आहे. ऍशेज मालिकेत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या खेळाडूंनी हा निर्णय घेतला. टी20 विश्वचषक 2022चा अंतिम सामना रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) खेळला गेला. या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून पराभव केला आणि यात हेल्सची भूमिका महत्वपूर्ण होती. या विश्वचषकात हेल्सने फलंदाजीत 6 सामन्यात 212 धावा केल्या. हेल्सने या विश्वचषकात दोन अर्धशतके लगावली.
हेल्सला मागच्या वर्षी कोलकाता संघाने 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या फलंदाजाने आतापर्यंत फक्त 6 आयपीएल सामने खेळले ते देखील 2018 मध्ये. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला नाही. आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. या लिलावाच्या आधी संघानी करारबद्ध खेळाडूंची यादी केली असून, आता करारमुक्त झालेले खेळाडू लिलावामध्ये भाग घेऊ शकतील.(Alex Hales backs out from IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दे घुमा के! अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत राजवर्धनने महाराष्ट्राला मिळवून दिला थरारक विजय
विश्वचषक जिंकताच इंग्लंडच्या प्रशिक्षकाने का केले मुंडन? कारण जाणून येईल हसू