इंग्लंडमध्ये सुरु असलेली द हंड्रेड लीग स्पर्धा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असे काही पराक्रम किंवा प्रकार घडत आहेत, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच रविवारी (८ ऑगस्ट ) ओवल इनविजिबल्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स यांच्यात झालेल्या सामन्यात असा काही प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ओवल इनविजिबल्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स यांच्यात पार पडलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यव आणला होता. त्यामुळे हा सामना ६५-६५ चेंडूचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात ओवल इनविजिबल्स संघाने ९ धावांनी विजय मिळवला. ओवल इनविजिबल्स संघाकडून जेसन रॉयने ५६ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
याच सामन्यात ट्रेंट रॉकेट्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऍलेक्स हेल्स सोबत असा काही प्रकार घडला जो तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. ओवल इनविजिबल्स संघातील वेगवान गोलंदाज रिसी टॉप्लेच्या षटकातील सलग २ चेंडू त्याच्या मांड्यांच्या मध्यभागी जाऊन लागले. त्यानंतर त्याला भरपूर वेदना झाली होती. (Alex Hales in pain after hitting unmentionables off consecutive deliveries by Reece Topley)
https://twitter.com/sparknzsport/status/1424546898480832514?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1424546898480832514%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-the-hundred-alex-hales-in-pain-after-getting-hit-on-the-unmentionables-off-consecutive-deliveries-by-reece-topley-oval-invincibles-vs-trent-rockets-4319416.html
एकीकडे वेगवान चेंडू मांड्यांच्या मध्यभागी लागल्याने हेल्सला वेदना होत होत्या. तर समालोचकांना हसू आवरत नव्हते. त्यावेळी हेल्स १० धावांवर खेळत होता. टॉप्ले जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा हेल्सने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि पुढील चेंडूवर २ धावा घेतल्या. त्यानंतर पुढील चेंडू आत आला आणि हेल्सच्या मांड्यांच्या मध्यभागी लागला, ज्यामुळे तो खाली बसला. त्यानंतर जेव्हा तो पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. परंतु दुर्देव असे की, पुढचा ही चेंडू त्याच्या पायाच्या मध्यभागी लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हेल्सने या सामन्यात १५ चेंडूंमध्ये २५ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने ‘या’ २ शतकवीरांना प्लेइंग इलेव्हनमध्ये द्यावी संधी, माजी कर्णधाराचा सल्ला
तमिळनाडूचा माजी कर्णधार भूषवणार निवड समितीचे अध्यक्षपद, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?
“ऑरेंज कॅप सर्वात निरर्थक पुरस्कार”, दिग्गज भारतीय खेळाडूचे मोठे विधान