इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्स हार्टलीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अहमदाबाद येथील दिवस-रात्र कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पुरुष संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर एलेक्स हार्टलीने त्यांची गंमत करणारे एक ट्विट केले होते. मात्र या ट्विटनंतर तिला चक्क जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली होती.
काय आहे प्रकरण?
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा पुरुष क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत होता. यातील तिसरा सामना अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर दिवस-रात्र स्वरूपात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यानंतर एलेक्स हार्टलीने एक ट्विट केले होते.
यात तिने “इंग्लंडच्या पुरुष संघाने सामना लवकर संपवून बरे केले. आता लोकं महिला संघाचा सामना पाहू शकतील”, असे ट्विट केले होते. इंग्लंडच्या पुरुष संघाचा सामना संपल्याच्या दिवशी संध्याकाळी इंग्लंडच्या महिला संघाचा सामना होता. म्हणून एलेक्स हार्टलीने हे ट्विट केले होते.
रॉरी बर्न्सने व्यक्त केली नाराजी
मात्र एलेक्स हार्टलीच्या या विधानावर इंग्लंडच्या पुरुष संघाचा खेळाडू रॉरी बर्न्सने नाराजी व्यक्त केली होती. “आम्ही महिला संघाला सपोर्ट करत असूनही असे विधान करणे, हे निराशाजनक आहे”, असे बर्न्स म्हणाला. या बर्न्सचे हे ट्विट जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांनी देखील लाईक केले होते.
मात्र त्यानंतर त्याचे अनुकरण करत सोशल मिडीयावर अनेकांनी एलेक्स हार्टलीवर टीका करायला सुरुवात केली. अनेकांनी अपशब्द वापरले तर एकाने चक्क त्याला जीवे मारण्याची देखील धमकी दिली. या प्रकारावर तिने आता नाराजी व्यक्त केली आहे. लोकं मला जीवे मारू इच्छितात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहिये, अशी प्रतिक्रिया तिने यावर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल होणार साउदम्प्टनच्या मैदानावर? या कारणामुळे लॉर्डस गमावणार यजमानपद
आयपीएल २०२१चे सामने तुम्ही स्टेडियममध्ये पाहू शकता? पाहा काय घेतलाय बीसीसीआयने निर्णय






