सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेचा बोलबाला सुरु आहे. या स्पर्धेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत मंगळवारी लंडन स्पिरिट आणि नॉर्दर्न सुपर चार्जर्स संघांत महिला आणि पुरुषांचा सामना पार पडला. पहिला महिला संघाचा सामना झाला, त्यानंतर पुरुष संघाचा सामना झाला. या सामन्यांदरम्यान एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली.
लंडन स्पिरिट आणि नॉर्दर्न सुपर चार्जर्सच्या महिलांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात लंडन स्पिरिट संघाने ७ विकेटने विजय मिळवला. त्यानंतर त्याचमैदानावर पुरुषांचा सामना खेळला जात होता. या सामन्यादरम्यान लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये एक अनोखे दृश्य सर्वांना पाहायला मिळाले. ते दृष्य म्हणजे लंडन स्पिरिट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस मोनाघनने पदवीधर (ग्रॅज्यूएट) झाल्याचा आनंद चक्क लॉर्ड्सच्या बाल्कनीत साजरा केला.
एलिस मोनाघन ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत असल्याने तिच्या महाविद्यालयात पदवी प्रदान संमारंभासाठी उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे तिला हा आनंद महाविद्यालयात जाऊ साजरा करता आला नाही. पण, म्हणून ती नाराज झाली नाही, तर तिने ती पदवीधर झाल्याचा जोरदार आनंद साजरा केला.
त्याच्या संघसहकारी खेळाडूंनी लॉर्ड्सच्या बाल्कनीत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन पार्टी करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान मोनाघन लॉर्ड्सच्या बाल्कनीत तिच्या गाऊन आणि ग्रॅज्युएशन कॅपमध्ये दिसून आली होती. तसेच ती ड्रिंक घेताना ही दिसून आली. सोशल मीडियावर मोनाघनाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. जर या महिलांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर लंडन स्पिरिट संघाने या सामन्यात १२७ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग केला आणि २ चेंडू बाकी ठेवत हा सामना आपल्या नावे केला.
Look at this legend, Alice Monaghan who missed her graduation to play in @thehundred. So she celebrated on the balcony at Lords!
Throwing her cap in the air and downing her drink – hero! 👏🏽 @SkyCricket pic.twitter.com/tUtyTIfh7m— Inzamam Rashid (@inzyrashid) August 3, 2021
या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत एका सामन्यातील एक डाव १०० चेंडूचा खेळला जातो. त्याचबरोबर या सामन्यात १ षटक हा ५ चेंडूंचा असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘द हंड्रेंड’मध्ये पुन्हा एकदा जेमिमा रॉड्रिग्जची वादळी खेळी, स्पर्धेत तिसऱ्यांदा झळकावले अर्धशतक
टी२० विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा हा ‘चॅम्पियन’ क्रिकेटर घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती