इंडियन प्रीमियर लीग 2025 (ipl 2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिथे टॉप दोन संघांसाठी चार संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्लेऑफमध्ये चार संघ पोहोचलेले आहेत. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्स(PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) या चारही संघाने प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता टॉप दोन संघांसाठी या चारही संघांमध्ये रंगतदार स्पर्धा सुरू आहे.
या चारही संघांपैकी दोन संघांना सरळ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. चारही संघ अजूनही दोन टॉप संघांमध्ये त्यांचे स्थान निश्चित करू शकतात. पण प्रत्येक संघासाठी परिस्थिती वेगळी आहे, कोणत्या संघाला मोठ्या अंतराने जिंकावे लागेल तर एखाद्या संघाला बाकी संघाच्या निर्णयावर निर्भर रहावे लागेल.
स्पर्धेमध्ये आज म्हणजेच (26 मे) सोमवार रोजी पंजाब किंग्स (PBKS vs Mi)विरुद्ध मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो क्वालिफायर 1 खेळेल.