पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पण त्याआधी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांचे खेळाडू मुक्त करण्याची तसेच खेळाडूंचे दुसऱ्या संघांशी ट्रेडिंग करण्याची मुदत होती.
त्यानुसार सर्व संघांनी त्यांच्या मुक्त केलेल्या खेळाडूंची तसेच संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. सर्व 8 संघांचे मिळून 127 क्रिकेटपटूंना त्यांच्या संघांनी संघात कायम केले आहे. यामध्ये 35 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
तसेच लिलावात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी मागील मोसमापेक्षा 13 व्या मोसमासाठी सर्व संघाकडे 3 कोटी रुपये ज्यादाचे असणार आहेत. आता प्रत्येक फ्रेंचायझीकडे मागील हंगामातील शिल्लक रक्कम, खेळाडूंना मुक्त केल्यानंतर शिल्लक रक्कम आणि या हंगामातील 3 कोटी रुपये असणार आहेत.
त्यामुळे आता प्रत्येक संघाकडे 13 व्या मोसमाच्या लिलावासाठी 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम आहे.
लिलिवाआधी मुक्त केलेले आणि संघात कायम केलेले खेळाडू –
1. चेन्नई सुपर किंग्स –
मुक्त केलेले खेळाडू –
सॅम बिलिंग्स, डेव्हिड विली, मोहित शर्मा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई.
संघात कायम केलेले खेळाडू – 20
एमएस धोनी, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिशेल सँटेनर, मोनू कुमार, एन जगदीसन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर , दीपक चाहर, केएम आसिफ.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 14.60 कोटी
2.दिल्ली कॅपिटल्स –
मुक्त केलेले खेळाडू –
ख्रिस मॉरिस, कॉलिन इंग्राम, हनुमा विहारी, अंकुश बैन्स, कॉलिन मुनरो, बंडारू अयप्पा, मनजोत कालरा, जलज सक्सेना, नाथू सिंह.
कायम केलेले खेळाडू – 14
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अमित मिश्रा, अवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, अजिंक्य रहाणे.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 27.85 कोटी
3.किंग्स इलेव्हन पंजाब –
मुक्त केलेले खेळाडू –
डेव्हिड मिलर, मोझेस हेन्रिक्स, सॅम करन, अँड्र्यू टाय, वरुण चक्रवर्ती, प्रभसीमरन सिंग, अग्निवेश अयाची.
कायम केलेले खेळाडू – 16
केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, निकोलस पूरन, मनदीप सिंग, के गॉथम, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंग, हार्दस विल्जोइन, एम अश्विन, जे सुचित, हरप्रीत ब्रार आणि दर्शन नळकंडे.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 42.70 कोटी
4.कोलकाता नाईट रायडर्स –
मुक्त केलेले खेळाडू –
रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, एन्रिच नॉर्जे, पियुष चावला, जो डेन्ली, यारा पृथ्वीराज, निखिल नाईक, केसी करियप्पा, मॅथ्यू केली, श्रीकांत मुंढे आणि कार्लोस ब्रेथवेट.
कायम केलेले खेळाडू – 14
दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनील नारायण, कुलदीप यादव, शुबमन गिल, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, संदीप वॉरियर, हॅरी गुर्नी, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, सिद्धेश लाड.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 35.65 कोटी
5.मुंबई इंडियन्स –
मुक्त केलेले खेळाडू –
एव्हिन लुईस, अॅडम मिलने, जेसन बेहरेन्डॉर्फ, ब्युरन हेंड्रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, मयंक मार्कंडे, बरिंदर स्रान, रसीख सलाम, पंकज जसवाल, सिद्धेश लाड, अलझरी जोसेफ.
कायम केलेले खेळाडू – 18
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिशेल मॅक्लेनाघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, ईशान किशन, अंकुल रॉय, धवल कुलकर्णी, आदित्य तारे, शेरफेन रुदरफोर्ड, जयंत यादव.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 13.05 कोटी
6. राजस्थान रॉयल्स –
मुक्त केलेले खेळाडू –
अॅश्टन टर्नर, ओशाण थॉमस, शुभम रांजणे, प्रशांत चोप्रा, ईश सोधी, आर्यमान बिर्ला, जयदेव उनाडकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी, लियाम लिव्हिंगस्टोन, सुदेश मिधून.
संघात कायम केलेले खेळाडू – 14
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरर, वरुण ऍरॉन, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, अंकित राजपूत.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 28.90 कोटी
7.रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
मुक्त केलेले खेळाडू –
मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप नाथ, नॅथन कुल्टर-नाईल, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, प्रयास रे बर्मन, टिम साउथी, कुलवंत खेजरोलिया, हिम्मत सिंग, हेन्रिच क्लासेन, चमा मिलिंद, डेल स्टेन.
कायम केलेले खेळाडू – 13
विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरकीरतमन, देवदत्त पाडीक्कल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 27.90 कोटी
8.सनरायझर्स हैद्राबाद –
मुक्त केलेले खेळाडू –
शाकिब अल हसन, युसुफ पठाण, मार्टिन गप्टिल, दीपक हूडा आणि रिकी भुई.
कायम केलेले खेळाडू – 18
केन विल्यम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशीद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बिली स्टॅनलेक, बासिल थंपी, टी नटराजन.
लिलावासाठी उपलब्ध असलेली रक्कम – 17 कोटी
टीम इंडियाचा बांगलादेशवर एका डावाने दणदणीत विजय!
वाचा????https://t.co/IUAbTUp9q2????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानात रचतोय धावांचा डोंगर आणि हॉटेलमध्ये खेळतोय पबजी!
वाचा????https://t.co/pjToqSY3rk????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019