भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ अशी सरशी साधली. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान भारतीय संघाने इंग्लडवर ३६ धावांनी विजय मिळवला. टी२० मालिकेच्या समाप्तीनंतर उभय संघ आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेचा कार्यक्रम आपण जाणून घेऊया.
येथे होणार वनडे मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला २३ मार्चपासून पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर सुरुवात होईल. ही मालिका तीन सामन्यांची असेल. हे तिन्ही सामने या एकाच मैदानावर खेळविण्यात येणार आहे. पहिला सामना मंगळवारी २३ मार्च, दुसरा सामना शुक्रवारी २६ मार्च व अखेरचा सामना रविवारी २८ मार्च या दिवशी खेळविण्यात येईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे तिन्ही सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील. तसेच, सामन्यांची नाणेफेक १ वाजता केली जाईल.
दौऱ्यावरील अखेरची मालिका
इंग्लंडचा संघ जानेवारी महिन्यात भारतात दाखल झाला होता. इंग्लंडला भारताविरुद्ध ४ कसोटी, ५ टी२० व ३ वनडे सामने खेळायचे होते. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशा पिछाडीवरून पुनरागमन करत ३-१ असा मालिका विजय साकारला होता. त्यानंतर, अहमदाबाद येथे झालेल्या टी२० मालिकेतही २-१ अशा पिछाडीवरून अखेरचे दोन्ही सामने जिंकत यजमान संघाने मालिका खिशात घातली होती. आता वनडे मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा मनसुबा असेल.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे..! रोहितने ‘या’ गेम चेंजर खेळाडूवर उधळली स्तुतिसुमने
कोहलीच्या सलामीला फलंदाजी करण्याच्या निर्णयाने ‘हे’ खेळाडू मुकतील वर्ल्डकपला
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने घेतले ‘हे’ अजब निर्णय, ज्याची कारणे आहेत अनाकलनीय