शनिवारी (14 ऑक्टोबर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 2036 ऑलिंम्पिक देशात आयोजित करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, कारण हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
भारत सरकार आणि भारतीय ऑलिंम्पिक असोसिएशन (IOA) ची संयुक्त समिती लवकरच 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी योजनेची रूपरेषा तयार करण्यासाठी एक बैठक बोलावेल. यादरम्यान महत्वाची गोष्ट म्हणजे 2036 ऑलिम्पिकसाठी यजमान देशाचा निर्णय पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या (IOC) निवडणुकीनंतर घेतला जाईल.
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या मान्यतेनंतर अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर 2028 च्या ऑलिंम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली, ज्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या स्पर्धेत टी-२० फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळले जाईल, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघ दिसणार आहेत.
क्रिकेट व्यतिरिक्त, इतर चार खेळ (बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश) देखील या स्पर्धेत समाविष्ट केले गेले आहेत, ज्यामुळे ऑलिंम्पिक खेळांमध्ये अधिक विविधता वाढली आहे. त्याच वेळी, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने ऑलिंम्पिकचे आयोजन करण्याच्या भारताच्या संधीबद्दल एक वक्तव्य केलं आहे.
तो म्हणाला की, “ऑलिंम्पिकचे आयोजन केल्याने भारताची क्रीडा संस्कृती मोठ्या प्रमाणात उंचावेल, ज्यामुळे कपिल देव आणि जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजी करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. 2036 ऑलिंम्पिकच्या यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील आहे. जर हा निर्णय भारताच्या बाजूने लागला तर ती संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असेल.” आता ऑलिंम्पिक २०३६ चे यजमानपद भारताला मिळणार का? याकडे संपुर्ण देशवासियांचे लक्ष्य लागुन राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?