राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्ससाठी हा पहिला आयपीएल हंगाम होता आणि त्यांनी पहिल्याच हंगामात अंतिम सामना गाठला होता. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स तब्बल १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला. मात्र, गुजरातने हा सामना जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या महत्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या २ खेळाडूंवर सर्वांची नजर होती, पण त्यातील एकाच फलंदाजाने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा भाग होते.
दक्षिण आफ्रिकी दिग्गज डेविड मिलर (David Miller) आणि भारतीय फलंदाज राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आयपीएलच्या या १५व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले. गुजरात टायटन्सने त्यांच्या खेळीच्या जोरावर काही सामन्यांमध्ये विजय मिळवला. मिलर आणि तेवतिया मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळत होते, पण यावर्षी राजस्थानने त्यांना रिलीझ केलेले. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सने या दोघांसाठी मोठी रक्कम खर्च करत त्यांना संघात सहभागी केले होते.
तेवतिया आणि मिलर दोघेही संघाने दाखवेलला विश्वासास पत्र ठरले. यांपैकी तेवतियाला अंतिम सामन्यात फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. कारण, डेविड मिलर आणि सलामीवीर शुबमन गिल यांनी संंघाला सामना जिंकून दिला. राजस्थान संघात असताना या दोघांनाही अपेक्षित संधी मिळताना दिसल्या नव्हत्या, पण गुजरात टायटन्समध्ये मात्र दोघांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी मिळाल्या आणि त्यांनी गुणवत्ता सिद्ध केली देखील.
डेविड मिलर या हंगामात गुजरात टायटन्ससाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डेविड मिलर सहाव्या स्थानी राहिला. त्याने या हंगामात १६ सामन्यात फलंदाजी करताना ६८.७१च्या सरासरीने ४८१ धावा कुटल्या. त्यानेही आपल्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. हंगामात ४८१ धावा करताना त्याने २ अर्धशतकेही चोपली. मिलरने हंगामात फिरकी गोलंदाजांच्या विरोधात उल्लेखनिय प्रदर्शन केले.
राहुल तेवतिया या हंगामात गुजरात टायटन्ससाठी एक उत्कृष्ट फिनिशरची भूमिका पार पाडली. तेवतियाने अगदी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून देखील गुजरातला सामना जिंकवून दिला आहे. त्याने या हंगामात गुजरातकडून फलंदाजी करताना १६ सामन्यात ३१च्या सरासरीने २१७ धावा चोपल्या. या धावा करताना त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ४३ इतकी होती.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ मधील पुरस्कारांवर बटलरचेच वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’