---Advertisement---

महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 12:24 AM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिलपासून ३१ एप्रिल पर्यंत संचारबंदी केली आहे. या संपूर्ण कालावधीत राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिस्थितीत मुंबईमध्ये होणाऱ्या आयपीएल सामन्यांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाच्या काळात आयपीएलचा १४ वा हंगाम भारतातील ६ शहरांमध्ये होत आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईचाही समावेश आहे. या हंगमातील १० सामने मुंबईत पण होणार आहेत. त्यातील २ सामने पार पडले असून ८ सामने बाकी आहेत. पण आता हे सामने नियोजित वेळेत मुंबईत होणार का असा प्रश्न होता. पण हे सामने नियोजित वेळेत मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबद्दल एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका सुत्राने सांगितले की ‘विशेष परवानगी घेतली असल्याने मुंबईतील सामन्यांनवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्वकाही नियोजनाप्रमाणेच होईल आणि आवश्यक ती खबरदारी या दरम्यान घेतली जाईल.’

सध्या आयपीएल सामने खेळण्यासाठी मुंबईत असलेले सर्व संघांचे खेळाडू बायोबबलमध्ये आहेत, त्याचबरोबर सध्या आयपीएलचे सामने बंद दाराआड म्हणजे प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत.

खरंतर, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच अनेक ग्राऊंडस्टाफ आणि खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पण खेळाडू बायोबबलमध्ये असल्याने आणि जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले ते क्वारंटाईमध्ये असल्याने त्याचा मोठा परिणाम स्पर्धेवर झाला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माबद्दल ‘तसं’ ट्वीट करणे स्वीगीला पडले महागात; मागावी लागली चाहत्यांची माफी

SRHvsRCB : बेंगलोरच्या गोलंदाजांच्या अखेरच्या क्षणी टिच्चून मारा; हैदराबादवर ६ धावांनी मिळवला विजय

राशिदचा ‘तो’ अप्रतिम झेल पाहिला का? व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---