---Advertisement---

राशिदचा ‘तो’ अप्रतिम झेल पाहिला का? व्हिडिओ होतोय व्हायरल

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 10:46 PM
---Advertisement---

बुधवारी (१४ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख फिरकीपटू राशिद खानने एक अप्रतिम झेल घेत चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राशिदचा नेत्रदीपक झेल
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत आरसीबीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. हंगामातील आपला पहिला सामना खेळणारा देवदत्त पडिक्कल चमक दाखवू शकला नाही व झटपट माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेल्या अष्टपैलू शाहबाज अहमदने एक षटकार मारला. मात्र, सातवे षटक टाकणाऱ्या शाहबाज नदीमने त्याला बाद केले.

या षटकातील पहिला चेंडू अहमदने मिडविकेटच्या दिशेने उंचावरून मारला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या राशिद खानने धावत येऊन सूर मारत हा झेल पकडला.

गोलंदाजीतही राशिदची कमाल
या अप्रतिम झेलानंतर राशिदने शानदार गोलंदाजी केली. त्याने बेंगलोरच्या फलंदाजांना जखडून ठेवत आपल्या ४ षटकात ४.५० च्या किफायतशीर इकॉनॉमी रेटने १८ धावा देऊन एबी डिव्हिलियर्स व वॉशिंग्टन सुंदर यांचे महत्वपूर्ण बळी आपल्या नावे केले. पहिल्या सामन्यात देखील त्यांनी अशाच प्रकारे धावांना लगाम घालण्याचे काम केले होते.

आरसीबीच्या १४९ धावा
प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलच्या ५९ व कर्णधार विराट कोहलीच्या ३३ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४९ धावा काढल्या. हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक ३ बळी मिळविले‌.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे विराटने मला आणि झम्पाला इडीयट्स म्हटले होते, मॅक्सवेलने केला खुलासा

कोच असावा तर असा! मुंबईच्या रोमहर्षक विजयानंतर जयवर्धनेच्या प्रेरणादायी भाषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई म्हणजे आयपीएलची अंडरटेकर; केकेआरविरुद्धच्या विजयानंतर सेहवागने शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---