सध्या भारतात आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. या हंगामासाठी फेब्रुवारी महिन्यात खेळाडूंचा लिलाव झाला होता. या मिनी ऑक्शनमध्ये अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडू करोडपती बनले. आयपीएलचा ‘मिलीयन डॉलर बेबी’ म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला मोठी बोली लावत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या ताफ्यात सामील केले. मात्र संघात निवडण्यापूर्वीच मॅक्सवेलला आरसीबीची कॅप देण्यात आली होती. त्या घटनेचा खुलासा आता स्वतः ग्लेन मॅक्सवेलने केला आहे.
मॅक्सवेलने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर १४ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, मॅक्सवेलला विकत घेण्याआधीच आरसीबीची कॅप मिळाली होती. याचा खुलासा स्वतः मॅक्सवेलने केला आहे.
आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, “आयपीएलचा लिलाव सुरू असताना आमचा ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडमध्ये मालिका खेळत होता. ऍडम झम्पाने त्यावेळी संयोगाने आपल्या किटबॅगमध्ये आरसीबीची कॅप घेऊन आला होता. लिलाव सुरू झाला असताना, त्याने मला कॅप दिली व छायाचित्र विराट कोहलीला पाठवून दिले. त्याखाली झम्पाने अभिनंदन मी आधीच त्याला आरसीबीची कॅप दिलेली आहे.”
अशी होती विराटची प्रतिक्रिया
मॅक्सवेलने त्यानंतर हे छायाचित्र पाहिल्यावर विराटने काय प्रतिक्रिया दिली, हे देखील सांगितले. ते छायाचित्र पाहिल्यावर विराटने ‘इडीयट्स’ असे म्हटले होते.
https://twitter.com/RCBTweets/status/1381811884249247749?s=20
हंगामाची दमदार सुरूवात
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात मॅक्सवेलने अप्रतिम फलंदाजी केली. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या या सामन्यात त्याने २ षटकार व १ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या होत्या. उर्वरित हंगामात देखील आरसीबीला त्याच्याकडून अशीच अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! एकट्याला विमान प्रवास करायला भीती वाटते म्हणून पाकिस्तानी क्रिकेटरने नाकारला परदेशी दौरा
मुंबई म्हणजे आयपीएलची अंडरटेकर; केकेआरविरुद्धच्या विजयानंतर सेहवागने शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ





