आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये अनेक रोमांचक सामने पार पडले आहेत. सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गनच्या हाती आहे. मॉर्गनला अजुनपर्यंत एकदाही या संघाला जेतेपद मिळवून देता आले नाहीये. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने या संघाला २ वेळेस जेतेपद मिळवून दिले होते. सध्या तो या स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. दरम्यान कर्णधार असताना त्याने कुठल्या खेळाडूसाठी सर्वात जास्त वेळ रणनिती आखण्यासाठी घालवला होता, याचा खुलासा त्याने केला आहे.
गौतम गंभीरने सलग ७ वर्ष कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केले होते. यादरम्यान त्याने २ वेळेस (२०१२, २०१४) कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या मते ख्रिस गेल, विराट कोहली किंवा एबी डीविलियर्स नव्हे तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी त्याने सर्वात जास्त वेळ रणनिती आखण्यासाठी घालवला आहे.
स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना गौतम गंभीरने म्हटले की, “जर तुम्ही रोहित शर्माची कामगिरी पाहिली तर त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी केली आहे. मी माझ्या ७ वर्षांच्या कारकिर्दीत ख्रिस गेल, कोहली किंवा एबी डीविलियर्ससाठी कधीच रणनिती आखली नाही. मला त्या ७ वर्षांत ज्या खेळाडूसाठी रणनिती आखावी लागली होती, तो रोहित शर्मा होता.”
गंभीरने २०११ पासून ते २०१७ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व केले होते. तसेच तो पुढे म्हणाला की, “रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी केली होती. हे कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नव्हते.” रोहितच्या नावे आयपीएल स्पर्धेत एकमात्र शतकाची नोंद आहे. हे शतक रोहितने ईडन गार्डनच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झळकावले होते.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ७ गडी राखून विजय
दरम्यान मुंबई इंडियन्सविरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सलामीवीर फलंदाज क्विंटन डीकॉकने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १५५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ५३ धावांचे बहुमूल्य योगदान देत,हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘या’ अष्टपैलूला ठोकायचेत ६ चेंडूत सलग ६ षटकार, सांगितली मनातील इच्छा
जगात भारी बापलेकाची जोडी! सचिनने मुलासोबतचा समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो केला शेअर
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम