क्रिकेट चाहत्यांना पुढील 2 आठवड्यात टी 20 चे 13 सामने पहायला मिळणार आहेत. तसेच या 2 आठवड्यातील या सामन्यांमुळे आयसीसीच्या टी20 क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
येत्या 2 आठवड्यात टी20 क्रमवारीत भारतासह आॅस्ट्रेलिया, इंग्लंड यांना अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे. तर पाकिस्तानला आपले अव्वल स्थान कायम ठेवण्याचे आव्हान आहे.
सध्या आयसीसीच्या टी20 क्रमवारीत पाकिस्तान 131 गुणांसह पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या स्थानी 126 गुणांसह आॅस्ट्रेलिया, तिसऱ्या स्थानी 123 गुणांसह भारत आणि इंग्लंड 115 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
हे चारही संघ पुढील 2 आठवड्यात टी20 सामने खेळणार आहेत. यात , 27 जूनला इंग्लंड-आॅस्ट्रेलियात एकमेव टी20 सामना आणि भारत-आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांची टी 20 मालिका सुरु होणार आहे.
तसेच 1-8 जूलै या दरम्यान झिम्बाब्वे, आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये तिरंगी टी 20 मालिका होणार आहे आणि 3-8 जूलै दरम्यान भारत-इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे.
त्यामुळे जर भारतीय संघाने या दोन आठवड्याच्या कालावधीत होणारे हे पाचही सामने जिंकले तर ते 127 गुणांवर पोहोचतील. त्याचबरोबर जर इंग्लंडने आॅस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध सर्व सामने जिंकले तर ते 126 गुणांवर जातील.
तसेच जर झिम्बाब्वेने तिरंगी टी 20 मालिकेच्या साखळी फेरीत आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला पराभूत केले तर भारत आणि इंग्लंडला आयसीसीच्या टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे.
याबरोबरच झिम्बाब्वे, आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिकेत जर आॅस्ट्रेलियाने साखळी फेरीत पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला पराभूत केले आणि त्याचबरोबर 27 जूनला होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जर विजय मिळवला तर ते अव्वल स्थानी असणाऱ्या पाकिस्थानला मागे टाकू शकतात.
त्याचबरोबर जर पाकिस्तानने तिरंगी मालिकेत साखळी फेरीतील चारही सामन्यात आणि अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला तर ते 136 गुणांवर पोहचतील.
महत्त्वाच्या बातम्या:
–…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!
–रहाणेला वनडेत का संधी दिली नाही? मुंबईकर दिग्गजाचे निवड समितीवर ताशेरे
–सेहवाग म्हणतो, या खेळाडूला ११ खेळाडूंमध्ये स्थान देऊ नका