---Advertisement---

MPL 2025 ची ऑरेंज कॅप सिद्धेश वीरच्या डोक्यावर, वाचा यापूर्वी कोणाला मिळालाय हा मान

On: सोमवार, जून 23, 2025 6:53 AM
---Advertisement---

एमपीएल 2025 ची रविवारी समाप्ती झाली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाने झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सने विजेतेपद उंचावले. अंतिम सामन्यात त्यांनी रायगड रॉयल्सला पराभूत केले. असे असले तरी, रायगडचा सलामीवीर सिद्धेश वीर याला स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यासाठी ऑरेंज कॅप देण्यात आली. त्याचवेळी आतापर्यंत या स्पर्धेत कोणी-कोणी ऑरेंज कॅप जिंकली आहे, याबाबत आपण जाणून घेऊया.

एमपीएल 2023: एमपीएलच्या या नव्या हंगामात कोल्हापूर टस्कर्स संघात अनेक अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. कोल्हापूरसाठी खेळणारा अनुभवी सलामीवीर अंकित बावणे याने या संपूर्ण हंगामात अक्षरशः धावांची लयलूट केली होती. फलंदाजीतील अनेक आकडेवारी मध्ये तोच अव्वलस्थानी दिसून आलेला. कोल्हापूर संघाला अंतिम सामन्यात पराभूत हवे लागले असले तरी, अंकित याने ऑरेंज कॅप आपल्या नावे केलेली. अंकित याने केवळ सात सामन्यात 362 धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्याची सरासरी ‌72.40 इतकी जबरदस्त राहिलेली. त्या हंगामात अंकित याने 1 शतक व चार अर्धशतके ‌पूर्ण केलेली. स्पर्धेत सर्वाधिक 45 चौकार त्याच्याच बॅटमधून आले होते.

एमपीएल 2024: एमपीएल 2023 प्रमाणेच एमपीएल 2024 ही अंकित बावणे याने आपल्या बॅटने गाजवले. सलग दुसऱ्या वर्षी त्याने कोल्हापूरसाठी खेळताना 12 सामन्यात 415 धावा विशेष म्हणजे तो हंगामात 400 धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज होता. या हंगामात देखील त्याची सरासरी 51 पेक्षा अधिक राहिली. त्याने यादरम्यान 45 चौकार व 12 षटकार मारले होते. यावेळी त्याच्या बॅटमधून चार अर्धशतके आलेली. तरी, सलग दुसऱ्या वर्षी त्याच्या संघाला विजेतेपद पटकावण्यात अपयश आलेले. क्वालिफायर 2 मध्ये पराभूत होत कोल्हापूर टस्कर्स संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

एमपीएल 2025: रायगड रॉयल्स संघाने स्पर्धेचा इतिहासात प्रथमच प्ले ऑफ्समध्ये आणि त्यानंतर फायनल मध्ये प्रवेश केला होता. संघाच्या या यशात उपकर्णधार व सलामीवीर सिद्धेश वीरचा सर्वात मोठा वाटा राहिला. त्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपवर आपला हक्क सांगितला. सिद्धेशने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली. त्याने हंगामात 11 सामने खेळताना 450 धावा जमवल्या. यादरम्यान त्याची सरासरी 56.25 अशी राहीली. त्याने हंगामात एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---