बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या सर्वत्र वाहवा लुटत आहे. पंड्याने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘मालिकावीर’ पुरस्कारही पटकावला. अशात त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो भलताच चर्चेत आहे. पंड्या म्हणाला की, त्याच्यात दबाव झेलण्याची क्षमता विकसित झाली आहे. तसेच, संघासाठी एमएस धोनी याच्यासारखी भूमिका निभावण्यात कोणताही त्रास नाहीये.
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पंड्याने गोलंदाजीसोबतच खेळपट्टीवर संथ फलंदाजी केली आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हादेखील त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये अशाच प्रकारची भूमिका पार पाडायचा. भारताने पंड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 168 धावांनी विजय मिळवली. तसेच, मालिकाही 2-1ने खिशात घातली. यावेळी तो म्हणाला की, “मला दुसऱ्या पद्धतीने जबाबदारी घेतली पाहिजे, जिथे मी भागीदारीत विश्वास ठेवतो. मला माझा संघ आणि फलंदाजांना हा विश्वास द्यायचा आहे की, मी तिथे त्यांच्यासोबत उपस्थित आहे. मी या संघातील इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक क्रिकेट खेळलो आहे. अशात अनुभवामुळे मी दबावात खेळण्यासोबतच प्रत्येक परिस्थितीत संघातील वातावरण शांत ठेवण्याची पद्धतही शिकलो आहे.”
For his overall show across the three games, Captain @hardikpandya7 bags the Player of the Series award.#INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/KGQ9vzjkWa
— BCCI (@BCCI) February 1, 2023
आपल्या फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला की, “कदाचित मला माझा स्ट्राईक रेट कमी करावा लागेल किंवा नवीन आव्हान स्वीकारावे लागेल. मला अशी भूमिका साकारण्यात कोणताही त्रास नाहीये, जी माही भाई साकारायचा.” हार्दिक पंड्या याने या त्याच्या टी20 कारकीर्दीत 87 टी20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 142.17च्या स्ट्राईक रेटने 1271 धावा केल्या आहेत. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला षटकार मारायला आवडतात. मात्र, एक खेळाडू म्हणून तुम्हाला आणखी चांगले होत जावे लागते. मला आणखी काही भूमिका साकारायच्या आहेत आणि मी फलंदाजीवेळी भागीदारीमध्ये विश्वास ठेवतो.”
भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात शानदार लयीत असलेल्या शुबमन गिल याच्या नाबाद 126 धावांच्या जोरावर 4 विकेट्स गमावत 234 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 66 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना 168 धावांनी खिशात घातला. (all rounder and skipper hardik pandya on ms dhoni role for india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या