इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023चा पहिला कसोटी सामना बर्मिंघम येथील एजबॅस्टन स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. 16 जूनपासून खेळल्या जात असलेला हा सामना आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या दोन्हीपैकी एक संघ हा सामना आपल्या नावावर करू शकतो. असे असले, तरीही ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन पुन्हा एकदा त्याच्या झेलामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
खरं तर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने भारतीय सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याचा असाच झेल पकडला होता. त्यावेळी गिलच्या झेलामुळे भलताच वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेतही त्याने इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट (Ben Duckett) याचा झेल घेतला, ज्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.
????What an incredible catch by Cameron Green!????#Ashes23 #Ashes2023 pic.twitter.com/XOIrtHb7vG
— Cricket Videos ???? (@Abdullah__Neaz) June 18, 2023
कॅमरून ग्रीनचा अविश्वसनीय झेल
इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावातील 9वे षटक ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स (Pat Cummins) टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डकेट स्ट्राईकवर होता. डकेटच्या बॅटची कड घेत चेंडू थेट गलीमध्ये उभ्या असलेल्या ग्रीनकडे गेला. चेंडू खाली असूनही त्याने झेल पकडण्यात कोणतीच चूक केली नाही. त्याने शानदार अंदाजात हा झेल पूर्ण करत सर्वांना हैराण केले. त्याच्या झेलाचा व्हिडिओही आता चर्चेचा विषय ठरत आहे. खरं तर, डकेट 19 धावांवर खेळत असताना झेलबाद होऊन तंबूत परतला.
शुबमन गिलच्या झेलामुळे झालेला वाद
खरं तर, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) शुबमन गिल याचाही ग्रीनने गलीमध्ये झेल पकडला होता. मात्र, हा झेल इतका स्पष्ट नव्हता, जितका डकेटचा होता. फोटोंमध्ये दिसत होते की, चेंडू मैदानाला लागत होता. तरीही पंचांनी गिलला बाद घोषित केले होते. यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. ग्रीनवर चीटर असा टॅगही लावण्यात आला होता. चाहते सामन्यातच चीटर-चीटर बोलत होते. मात्र, ग्रीनने पकडलेला डकेटचा झेल एकदम स्पष्ट होता. (all rounder cameron green catch ben duckett ashes 2023 eng vs aus see video)
महत्वाच्या बातम्या-
श्रीमंत हार्दिक! वहिनीने बूट चोरीसाठी मागितली मोठी रक्कम, पठ्ठ्याने झटक्यात ट्रान्सफर केली पाच पट रक्कम
झिम्बाब्वे-वेस्ट इंडिजची वर्ल्डकप क्वालिफायर्समध्ये विजयी सुरुवात, होल्डर-एर्विन चमकले