भारतीय संघ येत्या 23 ऑक्टोबर रोजी 8व्या टी20 विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तान संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापासून भारताच्या विश्वचषकातील अभियानाला सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाठीच्या दुखापतीतून बरा झालेला भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, चांगले आणि वाईट दिवस येतील, पण आम्ही सकारात्मक राहिले पाहिजे.
पुनरागमनाबद्दल हार्दिक पंड्याचे वक्तव्य
टी20 विश्वचषक 2022मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्याला सुरुवात होण्याच्या 3 दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने त्याच्या पुनरागमनाबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मूलभूत गोष्टींकडे परत जाणे आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहिल्याने मदत मिळते. त्यामुळेच मला आपल्या आयुष्यात नेहमीच चांगल्या गोष्टी पाहून शांती मिळाली आहे. मला वाटते की, माझे चांगले दिवस आणि वाईट दिवस असतील, पण सकारात्मकता मी केलेल्या मेहनतीमधून येते, जी मला सर्वकाही देण्यासाठी आत्मविश्वास देते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “यावेळी फरक फक्त एवढाच होता की, मला माझ्या पायांवर उभे राहण्यासाठी माझ्या कुटुंबाने मोठी भूमिका बजावली. याचे श्रेय नताशा, अगस्त्य, कृणाल यांना जाते. सर्वांनी मला माझे दररोजचं काम करत राहण्याची परवानगी दिली आणि हे निश्चित केले की, तुम्हाला माहितीये की, हार्दिकने आता स्वत:वर लक्ष दिले पाहिजे आणि त्याला स्वत:ला प्राधान्य दिले पाहिजे.”
हार्दिक पंड्याची कामगिरी
पुनरागमनाबद्दल पंड्याने शानदार कामगिरी केली. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा चोपणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला. त्याने 36.33च्या सरासरीने 151.38पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 436 धावा केल्या आहेत. फलंदाजीव्यतिरिक्त त्याने संघात महत्त्वपूर्ण संतुलन आणण्यासाठी 12 विकेट्सही घेतल्या आहेत. पंड्याने फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता पंड्या टी20 विश्वचषकात काय कमाल करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बड्डे आहे भावाचा! सचिनने सेहवागला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, इथेही केली सिक्सर मारण्याची विनंती
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट