---Advertisement---

हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 3:22 PM
Hardik-Pandya-And-Rohit-Sharma
---Advertisement---

Hardik Pandya Mumbai Indians Captain: आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. मुंबईने आयपीएल 2024 हंगामासाठी रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे संघाचे कर्णधारपद दिले. मुंबईकडून सांगण्यात आले होते की, त्यांनी घेतलेला निर्णय संघाच्या भविष्यासाठी होता. तसेच, त्यांनी रोहितच्या योगदानासाठी त्याला धन्यवादही दिला होता.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला ट्रेड केले होते. मात्र, पडद्यामागची गोष्ट जरा वेगळीच आहे. पंड्या सहजासहजी मुंबईच्या ताफ्यात जोडला गेला नव्हता. पुन्हा मुंबईकडून खेळण्यासाठी त्याने मुंबईपुढे अट ठेवली होती की, तो तेव्हाच संघात परतेल, जर त्याला संघाचा कर्णधार बनवले जाणार असेल.

पंड्याने ठेवली होती कर्णधार बनण्याची अट
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने संघाच्या मालकाला स्पष्टपणे सांगितले होते की, जर त्यांना मी संघात हवा असेल, तर हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा ते त्याला संघाचा कर्णधार बनवतील. बराच विचार केल्यानंतर मुंबईने पंड्याची अट स्वीकारली होती. तसेच, वनडे विश्वचषक 2023 दरम्यान रोहित शर्मा याला याबाबत सांगितले गेले होते. यानंतर रोहितने संघाच्या भविष्याचा निर्णय फ्रँचायझीवर सोडला होता. त्यानंतर मुंबईने हे पाऊल उचलले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1735939255552319531

रोहितला दिली होती पंड्याच्या कर्णधार बनण्याची माहिती
रोहित शर्मा (Rohit Sharma) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान मुंबईने सांगितले होते की, हार्दिक पंड्या यावेळी कर्णधाराच्या रूपात पुढील हंगामासाठी संघात परतत आहे. पंड्या या अटीवर गुजरातमधून मुंबईत जाण्यासाठी तयार झाला होता की, त्याला कर्णधार बनवले जाईल.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1735948335708864730

रोहितला विश्वचषकाच्या सुरुवातीच्या आसपास फ्रँचायझीचा रोडमॅप समजून घेण्यास सांगितले गेले होते. अनेक बैठकीत त्याला कर्णधाराची तातडीने बदल करण्याची गरजही सांगितली आणि तो आगामी हंगामासाठी पंड्याच्या नेतृत्वात खेळण्याच्या योजनेशी सहमतही झाला. रोहित आता जरी मुंबईचा कर्णधार नसला, तरीही तो या संंघाकडून फलंदाज म्हणून खेळत राहील आणि संघाला आपल्या अनुभवाचा फायदा करून देईल. (all rounder hardik pandya told mumbai indians i will back when lead team rohit sharma mi ipl 2024)

हेही वाचा-
रोहितला कर्णधार पदावरून काढल्याचं सर्वाधिक दु:ख धोनीच्या चेन्नईला, पोस्ट चर्चेत
कॅप्टन सूर्या अन् अर्शदीपचं वाजलं? टीम इंडियाच्या बसमध्येच गोलंदाजावर चिडला Sky, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---