वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात आयोजित होणार आहे. या स्पर्धेला पुढील महिन्यात म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी अनेक संघ आपापले संघ घोषित करत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियानेही आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात स्टार अष्टपैलू मिचेल मार्श याच्या नावाचाही समावेश आहे. मार्श मागील काही काळापासून आपल्या जबरदस्त प्रदर्शनाने सर्वांच्या भुवया उंचावताना दिसत आहे.
खरं तर, जेव्हाही मिचेल मार्श (Mitchell Marsh) सलामीला फलंदाजी करतो, तेव्हा तो विरोधी संघाच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याशिवाय राहत नाही. असे म्हटले जात होते की, मार्श विश्वचषकात सलामी करताना दिसेल. मात्र, अलीकडेच मार्शने डेविड वॉर्नर (David Warner) याला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठिंबा दिला.
मार्शच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला 3 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. अशात भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजी न करण्याविषयी मार्श काय म्हणाला, हे जाणून घेऊयात…
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सलामीला फलंदाजी करण्याविषयी मार्शचे विधान
मार्श म्हणाला, “मला आशा आहे, की मी मधल्या फळीत फलंदाजी करेल. आमच्याकडे ट्रेविस हेड आणि ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू (GOAT) डेविड वॉर्नर आहे. त्यामुळे मी म्हणत आहे, की कदाचित मी डावाची सुरुवात करणार नाही.”
खरं तर, मिचेल मार्श याच्यापूर्वी ऍरॉन फिंच याने ट्विटरवर (एक्स) एका युजरचम्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले होते, मला वाटते तिसऱ्या स्थानी मिचेल मार्श आणि चौथ्या स्थानी स्टीव्ह स्मिथने खेळले पाहिजे. सलामीला डेविड वॉर्नर उतरला पाहिजे. कारण, त्याच्याकडे खूप अनुभव आहे.
विश्वचषक 2023साठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क. (all rounder mitchell marsh On david warner said he should do opening for australia in world cup know here)
हेही वाचाच-
‘मूर्ख बनू नका…’, माजी दिग्गजाने निवडकर्त्यांना झाप झाप झापलं, ‘या’ खेळाडूच्या निवडीवर उठवले प्रश्न
वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’