भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या कसोटी सामन्यात नागपूर येथे आमने-सामने आहेत. उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेपेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांना पाहुण्या खेळाडूंना सुरुवातीलाच एक पाऊल मागे ढकलले. विशेष म्हणजे, अव्वल क्रमांकाच्या संघाला त्याच खेळाडूंनी सतावलं, ज्यांनी श्रीलंकेला गुंडाळलं होतं. अशात म्हटले जाऊ शकते की, भारतीय संघाने याच मैदानावर 2017मधील रणनीतीचा वापर केला आहे.
सन 2017मध्ये नागपूरच्या मैदानात काय झालं होतं?
सहा वर्षांपूर्वी 2017मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा सामना केला होता. मात्र, आता ऑस्ट्रेलियाला ज्या 3 खेळाडूंनी सतावलंय, त्याच खेळाडूंनी त्यादरम्यान श्रीलंकेला चिंतेत टाकले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दिवसी भारतीय फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी धमाल केली होती. त्यावेळी अश्विनने एकूण 4 विकेट्स, तर जडेजाने 3 विकेट्स चटकावल्या होत्या. असेच काहीसे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत पाहायला मिळाले. यावेळी फक्त जडेजाच्या खात्यात जास्त विकेट्स पडल्या. जडेजाने 5, तर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या.
Captain @ImRo45 departs a fine knock of 120.#TeamIndia 229/6, lead by 52 runs.
Live – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/fd73FrTz9U
— BCCI (@BCCI) February 10, 2023
भारतीय कर्णधारानेही चोप चोप चोपले
अश्विन आणि जडेजाव्यतिरिक्त तिसरा खेळाडू होता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). रोहितने श्रीलंकेविरुद्ध 160 चेंडूत 102 धावांची शानदार खेळी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही रोहितने इतिहासाची पुनरावृत्ती केली. त्याने 6 वर्षांनंतर त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले.
#TeamIndia's lead goes past 100 runs.
Live – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/d7ikvHxnfs
— BCCI (@BCCI) February 10, 2023
अष्टपैलू जोडीची कमाल
भारतीय संघाच्या फलंदाजीत खोली पाहायला मिळाली. म्हणजेच, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खास कामगिरी करू शकले नाहीत. अशात तळात फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेल आणि जडेजाने त्यांच्या फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ 144 धावांच्या आघाडीवर आहे. यावेळी जडेजा 66 धावा आणि अक्षर 52 धावांवर खेळत आहेत. दोघांनीही 81 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली आहे. (all rounder ravindra jadeja axar patel and rohit sharma repeated the history of 6 years ago in nagpur ind vs aus read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन
गडबड गोंधळ! थोडक्यात वाचला कॅप्टन रोहित, विराटलाही मागावी लागली माफी; प्रकरण जाणून घ्याच