Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जड्डू इज बॅक! चेंडूनंतर आता बॅटनेही राडा करतोय रवींद्र, अर्धशतक झळकावल्यानंतर केले खास सेलिब्रेशन; पाहा

जड्डू इज बॅक! चेंडूनंतर आता बॅटनेही राडा करतोय रवींद्र, अर्धशतक झळकावल्यानंतर केले खास सेलिब्रेशन; पाहा

February 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravindra-Jadeja-And-R-Ashwin

Photo Courtesy: Twitter/BCCI


चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले. नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे शानदार शतक साजरे केले. त्याच्याव्यतिरिक्त रवींद्र जडेजा यानेही पाहुण्या संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जवळपास सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जडेजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चोप देत कसोटीतील 18वे अर्धशतक साजरे केले. यानंतर त्याने अर्धशतकाचा जल्लोष केला, तो पाहण्यासारखा होता. यावेळी त्याचे सेलिब्रेशन पाहून विराटही खुश झाला. आता त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

अर्धशतक झळकावताच तलवारीप्रमाणे फिरवली बॅट
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने स्कॉट बोलँड याच्या 93व्या षटकातील चौथ्या चेंडूवर एक धाव घेत अर्धशतक साजरे केले. हे अर्धशतक करण्यासाठी त्याने 113 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याने 7 चौकारही मारले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 18वे अर्धशतक ठरले. जडेजाने 50 धावांचा आकडा पूर्ण करताच तलवारीप्रमाणे बॅट हवेत फिरवत आनंद साजरा केला. जडेजाचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13व्या सामन्यातील पाचवे अर्धशतक आहे. तसेच, त्याचे भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरे अर्धशतक ठरले.

And the trademark celebration is here 😀😀@imjadeja 💪

Live – https://t.co/edMqDi4dkU #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/Q1TPXZVLfE

— BCCI (@BCCI) February 10, 2023

Sir Jadeja Sword Celebration 🔥🔥
What a comeback. 5 wicket haul and now a fifty 💯💯#BorderGavaskarTrophy #INDvsAUS #Jadeja @CSKFansOfficial @CSKFansArmy @imjadeja pic.twitter.com/nqwgQgxFYw

— Chai Piyo Biscuit Khao (@a_posse_adesse) February 10, 2023

अश्विनही झाला खुश
जडेजाने अर्धशतक झळकावताच संपूर्ण स्टेडिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी डगआऊटमध्ये बसलेल्या आर अश्विन (R Ashwin) याचाही आनंद गगनात मावेनासा झाला. तो जागेवरून उठला आणि जडेजाच्या समर्थनार्थ आनंद व्यक्त करताना दिसला.

खास विक्रमाची नोंद
अर्धशतक करण्यापूर्वी जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात 5 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. खरं तर, जडेजाने एका कसोटीत 5 विकेट्स घेण्यासोबतच 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही सहावी वेळ होती. त्याने संयुक्तरीत्या आर अश्विनसोबत अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे, जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. मागील 6 डावांमध्ये जडेजाने 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ आहे.

सामन्याविषयी थोडक्यात
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जडेजा (5/47) आणि अश्विन (3/42) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 177 धावांवर सर्वबाद केले. यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने 120 धावांची शतकी खेळी साकारत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर पाडली. सध्या अक्षर पटेल 52, तर जडेजा 66 धावांवर खेळत असून भारतीय संघ 144 धावांच्या आघाडीवर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ


Next Post
Kabbadi

स्वामी समर्थ कबड्डी । युनियन बँक, आयएसपीएल बाद फेरीत

Todd-Murphy

"विराटची विकेट माझ्यासाठी स्पेशल", पदार्पण गाजवणाऱ्या मर्फीची प्रांजळ कबुली

Smriti-Mandhana

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का! स्टार क्रिकेटरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143