---Advertisement---

दुसरा दिवस रोहित-जडेजाच्या नावे! नागपूर कसोटीत टीम इंडियाकडे 144 धावांची आघाडी, मर्फीची एकाकी झुंज

On: शुक्रवार, फेब्रुवारी 10, 2023 5:16 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात सामन्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले. भारतीय फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर 144 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. कर्णधार रोहित शर्माचे शतक व रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची नाबाद अर्धशतके दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

 

पहिल्या दिवशी एक बाद 77 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. नाईट वॉचमन आलेल्या रविचंद्रन अश्विनने जबाबदारीने खेळ करत 23 धावा केल्या. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा अपयशी ठरला. पहिल्या सत्रा अखेरीस भारताने आपली धावसंख्या 3 बाद 151 होती. लंचनंतर मोठी धावसंख्या करण्याच्या उद्देशाने रोहित व विराट कोहली मैदानात उतरले मात्र विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने 12 धावा केल्या. सूर्यकुमार यादव देखील आपल्या पहिल्या सामन्यात चमक दाखवू शकला नाही.‌

त्याचवेळी रोहितने आपले नववे कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने रवींद्र जडेजासह सहाव्या गड्यासाठी 61 धावा करत संघाला आघाडीवर नेले. रोहित 120 धावांवर बाद झाल्यानंतर पहिला सामना खेळणारा भरतही फार काळ टिकू शकला नाही.

मात्र,  त्यानंतर जडेजाला अक्षर पटेल याची साथ मिळाली. जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अक्षरनेही वेगवान फलंदाजी करताना आपले दुसरे कसोटी अर्धशतक झळकावले. दोघांनी नाबाद 111धावांची भागीदारी करत भारताला 7 बाद 321 पर्यंत पोहोचवले. दिवसाखेर जडेजा 66 व अक्षर 52 धावा करून नाबाद आहे. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फी याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.

(India Took 144 Lead After Day 2 Stumps In Nagpur Test Rohit Jadeja Axar Shines Murphy Fight)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
कसोटीच्या पहिल्या डावात विराटकडून चाहत्यांचा अपेक्षाभंग! खेळपट्टीवर नाही देऊ शकला रोहितला साथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---