भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला 296 धावांवर सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 123 धावा केल्या होत्या. यामुळे त्यांच्याकडे 296 धावांचीच आघाडी झाली होती. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्यूशेन याच्या रूपात पाचवी विकेट गमावली. यानंतर रवींद्र जडेजा याने कॅमरून ग्रीन याला सतावत तंबूचा रस्ता धरण्यास भाग पाडले.
उमेश यादव (Umesh Yadav) याने मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हातून झेलबाद केले. लॅब्यूशेन 47व्या षटकात 124 धावसंख्येवर तंबूत परतला. त्यानंतर कॅमरून ग्रीन आणि ऍलेक्स कॅरे यांनी मोर्चा सांभाळत 62 षटकात 6 बाद 166 धावसंख्या उभारली.
यानंतर 63व्या षटकात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडे चेंडू सोपवला. तसेच, ऑस्ट्रेलियाला पुन्हा एक मोठा झटका लागला. जडेजाने या षटकात ग्रीनला चांगलेच सतावले आणि झाले असे की, अखेरच्या चेंडूवर ग्रीन शॉट न मारताच त्रिफळाचीत बाद झाला.
खरं तर, जडेजाच्या या षटकातील पहिल्या चेंडूपासूनच ग्रीन संघर्ष करत होता. जडेजाने अखेरचा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेरील रेषेत टाकला, जो वेगाने बाहेर निघाला आणि ग्रीनने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्ह्जला लागून स्टम्पवर जाऊन लागला. त्यामुळे ग्रीनला तंबूचा रस्ता धरावा लागला. यावेळी तोदेखील हैराण झाला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा ग्रीनला बाद करण्यासोबतच तीन विकेट्स पूर्ण केल्या. यापूर्वी त्याने स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांची विकेट घेतली होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाला 1 विकेट मिळाली होती.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी 8 विकेट्स गमावत 270 धावांवर आपला डाव घोषित केला. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले. (all rounder ravindra jadeja take cameron green wicket see video here)
महत्वाच्या बातम्या-
‘मी असं कधीच पाहिलं नाही…’, रहाणेच्या बॅटिंग Technique बद्दल एबी डिविलियर्सची मोठी प्रतिक्रिया
गांगुलींमुळे पाँटिंगचं नुकसान! आयपीएल 2024 मध्ये माजी बीसीसीआय अध्यक्ष घेणार ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जागा