भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर युवराजने भारतीय संघाने जिंकलेल्या दोन विश्वचषकामध्ये खूप मोलाचे योगदान दिले आहे. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी तो नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत येत असतो. नुकतेच त्याने कौतुक करावे, असे कार्य केले आहे.
युवराज सिंगची संस्था युवीकॅन फाउंडेशनने तेलंगणाच्या निजामाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात १२० क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) बेड पुरवले आहेत. यासाठी अॅकेंचरकडून फाऊंडेशनला आर्थिक सहकार्य मिळाले आहे. युवीकॅन फाउंडेशनने बीपीएपी मशीन्स, आयसीयू व्हेंटिलेटर, रुग्ण मॉनिटर्स, क्रॅश कार्ट्स आणि ऑक्सिजन सिलिंडर्स अशी वैद्यकीय उपकरणे रूग्णालयात पुरविली आहे.
याच दरम्यान युवराज सिंगने एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्या सर्वांचेच खूप नुकसान झाले आहे. आपण सर्वांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे आपल्याला ऑक्सिजन, आयसीयु बॅड आणि बाकीच्या महत्त्वाच्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागला.’
त्याचबरोबर युवराज पुढे म्हणाला की, अशा प्रकारच्या संकटामुळे आणि अनेक जीव गमावण्यासोबतच मला स्वतःला एका धक्क्यातून जावे लागले होते. त्यानंतर मी हे निश्चित केले की या जीवघेण्या वायरस विरुद्ध लढण्यासाठी मी आपल्या डॉक्टर आणि कामगारांना साथ देणार आहे. आमच्या मिशन १००० बेड्स पुरविण्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशातील क्षमता वाढविण्यासाठी रुग्णालयांमध्ये कोविड -१९ क्रिटिकल केयरची सुविधा सुरू करीत आहोत.’
Done and delivered! Yet another milestone in our initiative #Mission1000Beds. The successful delivery & e-inauguration of a 120-bedded critical care facility at GMC, Nizamabad, Telangana.
Thank you Accenture for all your support @YUVSTRONG12 @OneDigitalEnt @ravipv pic.twitter.com/rLZVtEms6E
— YouWeCan (@YOUWECAN) July 29, 2021
युवराज सिंगने बुधवारी (२८ जुलै) तेलंगणा राज्याचे गृहमंत्री मसूद अली, एक्सेंचर प्रतिनिधी आणि रुग्णालयाच्या काही प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा फलंदाज असेल शिखर धवनचा उत्तराधिकारी’, वीरूचे मोठे भाकीत
‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ शिखर धवनच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम
संयमाचे मिळाले फळ! वयाच्या तिशीत वॉरियर खेळतोय पहिला आंतरराष्ट्रीय सामना