---Advertisement---

या दिवशी मुंबईत होणार ऑल स्टार सामना; विराट, धोनी, रोहित खेळू शकतात एकाच संघाकडून

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबईत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. पण त्याआधी एक ‘ऑल स्टार गेम’ हा चॅरिटी सामना होणार आहे.

या सामन्याची घोषणा मागील महिन्यात बीसीसीआयने केली आहे. आयपीएल सुरू होण्याच्या तीन दिवस आधी हा ‘ऑल स्टार सामना’ होईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. या सामन्याची तारिख अजून बीसीसीआयने अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार हा सामना मुंबईत 25 एप्रिलला खेळला जाऊ शकतो.

तसेच हा सामना उत्तर व पूर्व आणि दक्षिण व पश्चिमच्या संघातील खेळाडूंमध्ये होईल. म्हणजेच उत्तर व पूर्वेेकडील संघामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघांतील खेळाडूंचा समावेश असेल. तर दक्षिण व पश्चिमच्या संघात चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघातील खेळाडूंचा समावेश असेल.

असे असले तरी अजून ‘ऑल स्टार गेम’ या सामन्यासाठी संघातील खेळाडूंची घोषणा झालेली नाही.

तसेच आयपीएल यावर्षी 29 मार्चपासून सुरु होणार असल्याने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड संघातील काही स्टार खेळाडू आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ या काळात 3 टी20 सामने खेळणार आहेत. तर इंग्लंड आणि श्रीलंका संघ 2 कसोटी सामने खेळणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेचा अंतिम टी20 सामना 29 मार्च रोजी संपेल. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस 31 मार्च आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229385543118708736

https://twitter.com/Maha_Sports/status/1229377374585806851

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---