ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची (2022 T20 World Cup) रंगत आता वाढली आहे. सुपर 12 फेरीचे सामने आता अखेरीकडे चालले आहेत. जवळपास सर्वच प्रमुख संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरतायेत. मात्र, त्याचवेळी सर्व संघांचे आपल्या सलामीवीरांच्या खराब फॉर्ममूळे टेन्शन देखील वाढले आहे. न्यूझीलंड वगळता सर्वच प्रमुख संघांचा एक तरी सलामीवीर या विश्वचषकात धावा काढण्यासाठी झगडताना दिसतोय.
यजमान ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी टी20 विश्वचषक उंचावला होता. त्या विश्वचषकत सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्पर्धेचा मानकरी ठरलेला. मात्र, यावेळी घरच्या मैदानावर खेळताना वॉर्नर सपशेल अपयशी ठरलेला दिसतोय. यावर्षी खेळलेल्या तीन सामन्यात तो अनुक्रमे 5,11 व 3 अशा धावा करू शकला आहे. पाकिस्तानचा कर्णधार व सलामीवीर बाबर आझमची परिस्थिती ही खराब दिसतेय. तो तीन सामन्यात मिळून फक्त 8 धावा करू शकलाय.
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल याची देखील परिस्थिती अशीच दुर्दैवी दिसून येतेय. भारताने खेळलेल्या तीनही सामन्यात तो दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला. त्याने अनुक्रमे 4,9 व 9 अशा धावा केल्या. विजयाचा रथावर आरूड असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याने देखील आपल्या संघाला सहयोग केला नाही. बवुमा 2, 2 व 10 अशा धावा करत अपयशी सलामीवीरांच्या यादीत समाविष्ट आहे. स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या इंग्लंडची परिस्थिती ही अशीच खराब झालेली दिसते. त्यांचे दोनही सलामीवीर पुरते अपयशी ठरलेत. कर्णधार जोस बटलरने 18 व 2 तसेच ऍलेक्स हेल्सनेही निराश करत 19 व 7 असे योगदान दिलेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! टी20 विश्वचषकातील सर्व चॅम्पियन संघ हरले, यंदा मिळणार नवा विजेता?
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…