आगामी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या महाकुंभमेळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. क्रिकेटप्रेमींमध्येही या स्पर्धेविषयी जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची सुरुवात रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) साखळी सामन्यांनी होईल. मात्र, क्रिकेटप्रेमींचा सर्वाधिक उत्साह दोन सामन्यांसाठी खूपच जास्त आहे. ते सामने म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात होणारा 22 ऑक्टोबरचा सामना. तसेच, दुसरा म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील 23 ऑक्टोबरचा सामना. आधी भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्याचे सर्व तिकीटे विकली गेली होती. आता यानंतर सुपर 12 फेरीचा पहिला सामनाही चर्चेत आहे.
सुपर 12 फेरीचा (Super 12 Round) पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia vs New Zealand) संघात होणार आहे. या सामन्यासाठीचे सर्व तिकीटे विकली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) ही घोषणा केली आहे. ऍरॉन फिंच याच्या नेतृत्वातील यजमान ऑस्ट्रेलिया संघ सिडनी येथे हा सामना खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. ही 2021मधील टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्याची पुनरावृत्ती असेल. कारण, यापूर्वी हे दोन्ही संघ टी20 विश्वचषक 2021मध्ये अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध होते. यामध्ये न्यूझीलंडला पराभूत करत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा टी20 विश्वचषक उंचावला होता.
आयसीसीने म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर खेळला जाणारा पुरुष टी20 विश्वचषक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी 6 लाखांहून अधिक तिकीटे खरेदी केली आहेत. याव्यतिरिक्त 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात खेळला जाणारा पुढील सामनाही हाऊसफुल असणार आहे. या सामन्याचे 90 हजारांहून अधिक तिकीटे अवघ्या 10 मिनिटांच्या आत विकले गेले होते. यावरून या सामन्याची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पाहायला मिळते.
विशेष म्हणजे, 27 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे होणाऱ्या डबल हेडर सामन्याचीही तिकीटे विकली गेली आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. तसेच, भारतीय संघाचा सामना अ गटातील उपविजेत्या संघासोबत होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओ: विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची खतरनाक गोलंदाजी चर्चेत, न्यूझीलंड फलंदाजाच्या बॅटचे दोन तुकडे






