---Advertisement---

यूएस ओपनच्या तिसऱ्या राउंडमध्येच थांबला टेनिस क्वीन सेरेना विलियम्सचा प्रवास

Serena Williams
---Advertisement---

टेनिस विश्वातील यावर्षीची शेवटची ग्रँड स्लॅम यूएस ओपन (US Open) 2022 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिने तिच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीतच तिचे आव्हान संपुष्टात आले. तिचा ऑस्ट्रेलियाच्या एजला टॉमलजानोविचकडून 5-7, 7(7)-6(4), 1-6 असा पराभव झाला आहे. टेनिसच्या कोर्टवर तिला शेवटचे खेळताना पाहायला आलेल्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. यावेळी तिलाही अश्रू अनावर झाले.

या महिन्यात 26 तारखेला वयाची 41वी ओलांडणाऱ्या सेरेना विलियम्स (Serena Williams) हिने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच ती निवृत्ती घेणार हे जाहीर केले होते. तिने आपल्या 27 वर्षाच्या टेनिस कारकिर्दीमध्ये एकेरीचे 23 ग्रँड स्लॅम्स जिंकले आहेत. त्यातील 6 यूएस ओपन, 7 ऑस्ट्रेलियन ओपन, 7 विम्बल्डन आणि 3 फ्रेंच ओपन या विजेतेपदकांचा समावेश आहे.

हा सामना झाल्यानंतर सेरेना भावूक झाली. तिचा हा व्हिडिओ यूएस ओपनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये तिने म्हटले, “येथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचे, जे इतक्या वर्षापासून मला समर्थन दर्शवत आले आहेत आणि माझे सामने पाहतात त्या सर्वांना धन्यवाद. हे सर्व माझ्या आईवडिलांपासून सुरू झाले. त्यांचीही मी आभारी आहे. त्यांनी म्हटले होते की जर विनस नसती तर सेरेनाही नसती. सेरेना विलियम्सचे अस्तित्व असण्यामागे हेच एकमेव कारण आहे.”

सेरेनाचा पहिला सामना
ऑक्टोबर 28, 1995मध्ये सेरेना क्युबेक सिटी (Quebec City) स्पर्धेत खेळली. त्यावेळी 14 वर्षाच्या सेरेनाला अमेरिकेच्या ऍनी मिलर हिने पराभूत केले. ऍनी ही सुद्धा त्यावेळी 18 वर्षाची होती आणि क्रमवारीत 149व्या स्थानावर होती. सेरेना-ऍनी सामना एक तासापेक्षा कमी वेळ चालला. हा सामना ऍनीने 6-1, 6-1 असा जिंकला.

ऑलटाईम फेवरेट का आहे सेरेना?
सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 92 सामने, फ्रेंच ओपनमध्ये 69, विम्बल्डनचे 98 आणि यूएस ओपनचे 108 सामने जिंकल्यावर टेनिसला बायबाय म्हटले आहे.

सेरेनाने चार ऑलम्पिक सुवर्ण पदक जिंकले आहेत. त्यामधील तीन पदके बहिण व्हिनससोबत जिंकले असून हा एक सार्वकालिन विक्रम ठरला आहे. तर एक पदक एकेरीमध्ये जिंकले.

सेरेनाने 23 ग्रँड स्लॅम्स आपल्या नावावर केले आहेत. हे महिला एकेरीच्या टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम्स ठरले असते जर तिने आणखी एक ग्रँड स्लॅम्स जिंकले असते. मार्गरेट कोर्टने सर्वाधिक असे 24 ग्रँड स्लॅम्स जिंंकले आहेत.

सेरेनाने सर्वाधिक वेळ अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो लागोपाठ 186 आठवडे डब्ल्यूटीएच्या क्रमवारीत महिला एकेरीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पाकिस्तानी संघाने केली टीम इंडियाची नक्कल! दरियादिली दाखवल्यानंतरही होत आहेत ट्रोल
आता श्रीलंका अफगाणिस्तानची जिरवणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘ही’ तगडी इलेव्हन उतरवणार
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---