सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवत दोन्ही सामने खिशात घातले. विशेष म्हणजे दोन्ही सामने तीन दिवसांत संपल्याने ऑस्ट्रेलियन संघावर टीका होत आहे. त्याचवेळी आता ही मालिका ज्यांच्या नावाने खेळली जाते, ते ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी थेट ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याच्यावर निशाणा साधला.
ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या अपेक्षेने या मालिकेत सहभागी झाला होता. अनेक माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया संघाला या मालिकेत विजयाची संधी असल्याचे म्हटलेले. मात्र, प्रत्यक्ष सामन्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा दुबळा दिसून आला. भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाच्या सर्वच फलंदाजांनी अक्षरशः नाग्या टाकल्या. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी भारतीय संघाने तीन दिवसात जिंकत चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले.
संघाच्या या अपयशानंतर ऍलन बॉर्डर संतापलेले दिसले. त्यांनी दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्स याने वापरलेल्या रणनीतीवरच आक्षेप घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने केवळ एक वेगवान गोलंदाज उतरवला होता. स्वतः कर्णधार कमिन्स हा वेगवान गोलंदाजाच्या रूपात खेळला. त्याने फारशी गोलंदाजी देखील केली नाही. त्यामुळे बॉर्डर नाराज झाले. ते म्हणाले,
”मला वाटते की पॅटने स्वतःहून कमी गोलंदाजी केली. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्याची संधी होती. भारताचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने आक्रमकपणे एक स्पेल टाकला असता तर, परिस्थिती वेगळी असती.”
बॉर्डर यांनी संघातील अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांच्या देहबोलीवर देखील टीका केली.
(Allan Border Blame Australian Captain Pat Cummins For Teams Poor Performance In Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल, सेल्फी प्रकरण चिघळले (mahasports.in)