भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी हा सामना संपवला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या नामुष्कीजनक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व ज्यांच्या नावाने ही मालिका खेळली जाते ते ऍलन बॉर्डर हे संतापलेले दिसले.
ऑस्ट्रेलियन संघ या दौऱ्यावर चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने अत्यंत बेजबाबदार खेळ दाखवला. एका चांगल्या खेळपट्टीवर फिरकीची धास्ती घेतल्याने त्यांचे फलंदाज पूर्णतः अपयशी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 177 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात तर ऑस्ट्रेलियन संघाचा खेळ आणखीनच खालावला. भारतीय फिरकीपटूंपुढे ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 91धावावर गडगडला.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी या सामन्यात भारतीय फिरकीपटूंची चांगलीच धास्ती घेतली होती. गोलंदाजांच्या सरळ चेंडूंचा देखील ते सामना करू शकले नाहीत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा अनेकदा चकल्यानंतर गोलंदाजाला अंगठा दाखवत, त्याचे कौतुक करताना दिसला. त्याच्या याच कृतीवर बॉर्डर हे भडकले.
प्रसारण वाहिनीशी बोलताना बॉर्डर म्हणाले,
“गोलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकतोय आणि तुम्ही त्याला थंब देताय. तो तुम्हाला फसवत असताना तुम्ही थंब कसा दाखवू शकता? हे अतिशय खराब होते. या पलीकडे मूर्खपणाचे काय ठरू शकते?”
बॉर्डर यांनी स्मिथ याचे नाव घेतले नसले तरी तो इशारा त्याच्यासाठीच होता. असे असले तरी, या सामन्यात स्मिथ हाच ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने पहिल्या डावात 37 धावांची खेळी केली. तर, दुसऱ्या डावात तो नाबाद राहिला.
(Allen Border Angry On Steve Smith Thumbs Up In Nagpur Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सध्या खूपच घाबरलेलो आहे…’, पहिल्या कसोटीत विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या अश्विनचे खळबळजनक विधान
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’