भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि 132 धावांनी मोठा विजय मिळवला. तसेच, पुन्हा एकदा दाखवून दिले की, मायदेशात आपण किती मजबूत आहोत. हा सामना सुरू असताना तिसऱ्या दिवशी एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या फलंदाजीने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतोच, पण त्याने केलेली वक्तव्येही सर्वत्र हशा पिकवतात. असेच काहीसे यादरम्यानही झाले. त्याच्या एका कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आर अश्विन (R Ashwin) हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील 18वे षटक टाकत होता. त्यावेळी दुसऱ्या चेंडूवर पीटर हँड्सकाँब याच्याविरुद्ध त्याने पायचीत बादसाठी अपील केली. मात्र, पंचांनी रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला नाबाद घोषित केले. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने रिव्ह्यूची मागणी केली. ज्यावेळी तिसरे पंच स्क्रीनवर चेंडू तपासत होते, तेव्हाच कॅमेरामन रोहित शर्मावर फोकस करत राहिला. रोहितसोबत मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव आणि केएस भरत हे खेळाडूही दिसले.
रोहितची रिऍक्शन
कॅमेरामन बराच वेळ रोहितवर फोकस करत राहिला. यानंतर रोहित जे काही म्हणाला, ते ऐकून त्याच्या बाजूला उभा असलेला सूर्यकुमारही त्याचे हसू रोखू शकला नाही. झाले असे की, रोहित कॅमेरामनकडे पाहून म्हणतो की, “अरे मला काय दाखवतोय? स्क्रीनवर रिप्ले दाखव ना.” रोहितच्या या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Rohit literally said – mujhe kya dikha rha hai vo dikha 😂😭 pic.twitter.com/8vSVjTb3ib
— crickaddict45 (@crickaddict45) February 11, 2023
भारतीय संघाची मालिकेत 1-0ने आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 177 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्याच डावात सर्व विकेट्स गमावत 400 धावांचा डोंगर रचला. भारतीय संघाला पहिल्या डावामुळे 223 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून खूपच खराब फलंदाजी पाहायला मिळाली. त्यांचा आख्खा संघ अवघ्या 91 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे भारताने 1-0ने विजयी आघाडी घेतली. (ind vs aus first test captain rohit sharma hilariously sends a message to cameraman know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“ते विमानात बसले तेव्हाच घाबरले”, दणदणीत विजयानंतर जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियन संघाची खिल्ली
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?