---Advertisement---

वॉर्नरला अश्विनने बनवलाय बकरा! कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत इतक्या वेळा केली शिकार

On: शनिवार, फेब्रुवारी 11, 2023 5:39 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. पाच दिवसांचा कसोटी सामना यजमान भारतीय संघाने तिसऱ्याच दिवशी संपवला. ‌या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. भारतीय संघाकडून या सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक आठ बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला तंबूचा रस्ता दाखवत एक नवा विक्रम स्वतःच्या खात्यात जमा करून घेतला.

ऑस्ट्रेलियन संघ या दौऱ्यासाठी भारतात आल्यापासून सातत्याने अश्विन हा धोकादायक ठरणार असल्याचे म्हणताना दिसलेला. अगदी अश्विनसारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिठीया या युवा गोलंदाजाला देखील त्यांनी संघासोबत जोडले होते. मात्र, तरीदेखील अश्विन आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरला. त्याने पहिल्या डावात तीन फलंदाजांना बाद केले. तर, दुसऱ्या डावात पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत त्याने भारताचा विजय सोपा केला.

या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला दुसऱ्या डावात पायचित केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 11 व्या वेळी वॉर्नरला माघारी धाडण्याची कामगिरी करून दाखवली.‌ अश्विन याने इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याला देखील अकरा वेळा कसोटीमध्ये बाद केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कुक याला नऊ तर न्यूझीलंडचा अनुभवी टॉम लॅथम याला देखील आठ वेळा बाद करण्यात त्याला यश आलेय. विशेष म्हणजे हे सर्व फलंदाज डावखुऱ्या हाताचे आहेत.

रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद केलेले फलंदाज

डेव्हिड वॉर्नर 11 वेळा

बेन स्टोक्स 11 वेळा

ऍलिस्टर कुक 9 वेळा

टॉम लॅथम 8 वेळा

(David Warner Most Times Getting Out Against R Ashwin In Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---