Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार

मोहम्मद शमीची आश्चर्यकारक आकडेवारी, कसोटीत ठोकलेत विराट आणि द्रविडपेक्षा जास्त षटकार

February 11, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Mohammad Shami

Photo Courtesy: Twitter/


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने 223 धावांची आघाडी घेतली. यात कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. शेवटच्या षटकातांमध्ये जडेजा आणि अक्षर पटेलच्या साथीने मोहम्मद शमी देखील महत्वपूर्ण योगदान देऊ शकला. शमीने पहिल्या डावात तीन अप्रतिम षटकार मारले आणि खास यादीत दिग्गज भारतीय फलंदाजांना देखील मागे टाकले.

मोहम्मद शमी (Mohammad Shami) भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज अशला, तरी फलंदाजांच्या खास यादीत त्याने माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला पझाडले. विराट कोहलीच्या नावावर 24 कसोटी षटकारांची नोंद आहे. शमी आता 25 कसोटी षटकारांच्या मदतीने विराटच्या पुढे गेला आहे. शनिवारी (11 फेब्रुवारी) मोहम्मद शमी नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला आला. त्याने 47 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 37 धावा कुटल्या. संघाची धावसंख्या उंचावण्यासाठी शमीच्या धावा महत्वाच्या ठरल्या. भारताचा पहिला डाव 400 धावांवर गुंडाळला गेला.

विराट कोहली (24), रवी शास्त्री (22), युवराज सिंग (22), ईरफान पठाण (18), केएल राहुल (17), चेतेश्वर पुजार (15), शिखर धवन (12), राहुल द्रविड (21), मोहम्मद अझरुद्दीने (19) आणि के श्रीकांत (19) या भारतीय दिग्गजांच्या तुलनेत मोहम्मद शमी पुढे निघाला आहे. शमीच्या नावावर 25 म्हणजेच विराटपेक्षा एका अधिकच्या षटकाराची नोंद झाली.

दरम्यान, भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार करणाऱ्यांचा एकंदरीत विचार केला, तर यादीत पहिला क्रमांका विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याचा येतो. सेहवागच्या नावावर 90 कसोटी षटकारांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे नाव आहे. धोनीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 78 षटकार कुटले. तिसऱ्या क्रमांकावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे, ज्याने कारकिर्दीत एकूण 69 कसोटी षटकार मारले. (Mohammad Shami also surpassed Virat Kohli and Rahul Dravid in terms of Test sixes)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘मुंबईचे माजी खेळाडू साऊथच्या खेळाडूंना चांगलं बोलत नाहीत’, भारतीय दिग्गजाचा मांजरेकरांवर गंभीर आरोप 
फ्लॉप होऊनही राहुलला फलंदाजी प्रशिक्षकाचा भक्कम पाठिंबा का? म्हणाले, ‘केएलसाठी प्रामाणिकपणे सांगतो…’


Next Post
Mohammed-Shami-And-Todd-Murphy

भारतीयांना सतावणाऱ्या मर्फीचा शमीने उठवला बाजार, गुडघ्यावर बसून भिरकावला गगनचुंबी षटकार; व्हिडिओ पाहाच

Team-India

भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी

Ravichandran Ashwin

अनिल कुंबळेंच्या मोठ्या विक्रमाला धक्का! मायदेशात कसोटी खेळताना अश्विनने रचला इतिहास

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143